Marathi Article – पहिलं प्रेम…. आठवण….आयुष्य!!!!

3
2775

 Marathi Article – पहिलं प्रेम आठवण आयुष्य

Marathi-Article(Pic – Aakash Bhoir)

आठवणींची एक वेगळीच गम्मत असते. काही आठवण पुस्तकात जपून ठेवलेल्या  मोरपंख सारखे असतात. पहिलं  प्रेम हे त्यातलच एक.

अनेक कारण असतात दोन प्रेमी दुरावल्या साठी. पण मना पासून आणि नजरे पासून दूर असून सुद्धा एक अदृश्य धाग्याची टोक ते दोघं हि धरून असतात. माणसाच्या मनात रुजणारी हि अशी एक भावना आहे जी कदाचित ज्यांच्या मनात असते ते सुद्धा कधी समझू नाही शकत. अलोव्किक अशी.नाजूक. पहिल प्रेम फसते आणि मन सुन्न होतं. आयुष्याच्या त्या कुमार वयात ज्यांनी साथ  दिलेली असते ते अचानक साथ सोडून जातात आणि आपण भावनांनी मुके होतो. कारणे काहीही असो परिस्तिथी सारखीच असते. पण खरच इतकं कठीण असतं का पहिल प्रेम विसरणं. माणूस जातो. नाती तुटतात.मार्ग बदलतात सहवास बदलतो  मग आठवणी का तश्याच खडकांवर रुजलेल्या शेवाळासारखी. ताजी टवटवीत. ते पुसून काढण्यसाठी आपण तो नाका सोडतो. ती माणसं सोडतो.

ते दिवस पाटीवरून साफ पुसून काढतो. तरी सुद्धा वार्याची एक झुळूक येते आणि दूर गेलेलं आठवणींच जुनं  पान आपल्याच मनाच्या बागेत पुन्हा दिसतं… काही कोडी खरच न सोडवण्य करिता असतात. आठवणींच तसच असतं. दिवस मावळतात.ऋतू बदलतात. पण मनाच्या गाभार्यात पहिलं  प्रेम तसच  मूळ धरून उभं असतं . आपण मोठे होतो नवीन नाती जोडतो… रमतो हि आपल्या आयुष्यात. पण एखाद्री संध्याकाळ अशी येते कि दूर समुद्रात दिसणारी एक होडी आपल्याला पुन्हा त्याच किनार्यावर नेहून सोडते. इथे आपण आणि पलीकडे ती. कधी हि न भेटण्या साठी .

खरच… पहिलं  प्रेम म्हणजे गम्मत असते हा…. ज्याची मज्जा आपण आयुष्य भर लुटत असतो

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here