कवी – रवींद्र बागडे
संपर्क – ravindrabagade1@gmail.com
नोटबंदी – Marathi Kavita Notabandi
नोटाबंदीच्या काळात धडपडलो
बॅकांतून थरथरलो
तिन्ही सांजच्या वेळातून
प्रात:स्मरणाच्या वाटेवर आलो
आले बुवा गेले बुवा
आचार्य म्हणतात बुवा तेथे बाया
तुरूंगात झाली काहींची रया
बदल बदलते क्षण
आकाशवाणीवरचे मन
विकसनशील देशाची भाषा
भाषे भाषेतील अनंत उदगार
उदगारातील अर्वाच्यपण
विचार करतेय स्वतंत्र मन
काय करू,कुणाकडे जाऊ,कसा जाऊ
या तिन्ही सांजच्या वेळातून
सावित्रीला सांगतोय
तू तिथेच थांब_ __
ह्या सत्यवानाला जाऊ देत_________!