मनातले ऋतू – Marathi Kavita

26
1276
Marathi Kavita – Manatale Rutu

Marathi Kavita – Mantale Rutu – मनातले ऋतू 

कवयित्री – आर्या

असतात बदलते ऋतू, आपल्या पण मनात
कधी उन्हाळा ,कधी हिवाळा,तर कधी धुंद बरसात

  आपल्या मनाचा आरसा,असतो आपला चेहरा 
मनातल्या ऋतूंचा बदल, दिसतो त्यावर गहिरा 

मनातल्या पावसात धुंद होतो,आनंदात भिजून 
तर मनातल्या उन्हात मात्र, जातो उदासीत थिजून 

निसर्गाचे ऋतू चक्र, असते माहित आपणास
उन्हानंतर पाऊस,आणि मग हिवाळा असणार हे खास 

मनाच्या ऋतू चक्राला, नसतो कधीच क्रम 
असला तर असतो, फक्त भावनांचा भ्रम..फक्त भावनांचा भ्रम

  ….आर्या 

26 COMMENTS

  1. हो खरच, मनाच्या ऋतू चक्राला, नसतो कधीच क्रम , छान कविता.

  2. ​मनातील आनंद आणि ताण यांची ऋतूंशी घातलेली सांगड उत्तम

  3. प्रत्येक मनातील भावना व्यक्त करणारं काव्य !!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here