Marathi Actor Amey Wagh Getting Married Soon – अमेयच लग्न

2
4740

Marathi Actor Amey Wagh Getting Married Soon – अमेयच लग्न

Marathi-Actor-Amey-Wagh

मराठी अभिनेता अमेय वाघला आता आपण सर्वच ओळखत असाल, दिल दोस्ती दुनियादारी या संजय जाधव यांच्या मालिकेतून अमेय घराघरात पोहचला आणि अनेक तरुण तरुणींची माने जिंकला. या मालिकेआधी अमेयने अनेक मराठी शोर्ट फिल्म आणि नाटकांमध्ये उत्तम अभिनय केलाय.

Marathi-Actor-Amey-Wagh

नुकताच अमेयचा मुरंबा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये अमेयने अतिशय उत्तम अभिनय केलाय. पोपट, अग्निदिव्य, घंटा, यशवंती जोशी कि कांबळे, शटर अश्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, संगीत मान अपमान, गेले एकवीस वर्ष आणि दळण या नाटकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली.

Marathi-Actor-Amey-Wagh

एवढ्यावरच न थांबता अमेयने भाडीपा म्हणजेच भारतीय दिगीतल पार्टी या युट्युब वाहिनीवर कास्टिंग काउच या वेब सिरीज मध्ये निपुण धर्माधिकारी सोबत तरुण मराठी रसिकांचे मनोरंजन केले.

Marathi-Actor-Amey-Wagh and Nipun Dharmadhikari Casting-Cauch-Marathi-Web-series-marathi-actor-amey-waghनुकतेच अमेयने त्याच्या फेसबुक वर , तो लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची बातमी सर्व रसिकांना दिली.

अमेयने त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाह करणार असल्याचे जाहीर केले, अमेय सांगतो. “ती मला गेल्या १३ वर्षांपासून सहन करत आहे, आणि तिला पुढेही खुशीत राहण्याची आशा आहे, त्यामुळे अश्या शूर मुलीला तुम्ही आशीर्वाद द्या आणि माझे अभिनंदन करा. ” असे म्हणत अमेयने दोघांचा फोटो फेसबुक वर प्रकाशित केला.

Marathi-Actor-Amey-Wagh-And-wouldbe-Wife-Sajiri-deshpande

अमेय आणि साजिरी दोघांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मराठीबोली काडून खूप खूप शुभेच्छा..

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here