Marathi Kavita – भेट…

0
2783

Marathi Kavita – भेट…

Marathi-Kavita

मातीच्या भेटीची
ओढ नभाला 
गर्जतो बेभाम
भेटण्या सखीला
 
काय वर्णावे
भेटीच्या प्रसंगाला
येई उधाण
मोहित मृद्गंधाला
 
उधळण रंगांची
शोभे नभाला
सप्तरंगी इंद्रधनू
उभा कमानीला
 
भेटीने दोघांच्या
उल्हास निसर्गाला
नवचैतन्य मिळे
साऱ्या जगाला
 
– मिलिंद डोंबाळे (देशमुख) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here