जगावे असे की जीवनाचे गाणे व्हावे.
अंधाराला भेदून आपण ही कोणाची सकाळ व्हावे.”
(sangieta devkar)
Marathi Katha – Sathiya
हैलो,मी सुहास काल आपन भेटायचे ठरवले होते.
हो ,मी संयुक्ता नमस्कार.
तुम्ही काय घेणार चहा कॉफी काही दूसरे ऑर्डर करू?
नको फक्त कॉफी सांगा.. संयुक्ता जरा निवांत बसत म्हणाली.
मिस संयुक्ता मला तुमचा बायोडेटा आवडला आणि तुम्ही सुद्धा. तुमचा काय विचार आहे ,आपण पुढे जावू शकतो का?
हे बघा सुहास तुम्हाला माझ्या बद्दल जी मी बायो मध्ये माहिती दिली तेवढच ठावुक आहे. पण काही माझ्या पर्सनल बाबी आहेत त्या सांगण्या साठीच मी तुम्हाला इथे बोलवले.
हो शुअर,प्रत्येकाच काही ना काही पर्सनल असतेच . काही गोष्टी या लग्ना आधी किल्यर झालेल्या चांगल्या असतात.
तुम्ही समजता तस काही नाही मिस्टर सुहास,मी एक उच्च पदवीधर मुलगी आहे. आयटी क्षेत्रात चांगला जॉब करते. घरी आई बाबा आणि एक लहान भाऊ आहे. कॉलेज मध्ये असल्या पासुनच मी वेगळ काही थ्रिलिंग करण्या साठी सतत धडपडत होते. जे लोक रूटीन म्हणून करतात तस मला जॉब एकी जॉब नव्हते करायचे. म्हणून मी एका एनजीओ ला कनेक्ट झाले. या एनजीओ मार्फ़त मी समाजसेवा करते.
तिला मध्येच तोडत सुहास बोलला,मग छानच आहे की. मला आवडेल तुम्ही यात सक्रिय रहा नो प्रॉब्लेम.
मिस्टर सुहास,माझ बोलन नीट ऐकून घ्या. आम्ही एनजीओ मार्फ़त दर शनिवार रविवार बुधवार पेठेत जातो आणि तिथल्या वस्तीतील लहान मुलांना शिकवतो. इनफ़ैक्ट तिथल्या एका प्रॉस्टिट्यूट ची एक लहान मुलगी मी दत्तक घेणार आहे.
पण मिस संयुक्ता हे समाज कार्य वैगेरे ठीक आहे पण मुलगी दत्तक घेणे म्हणजे ..
सुहास ,माझे विचार असेच आहेत काहीतरी आउट ऑफ वे जावून करायला मला आवडते.बघा माझे विचार पटत असतील तर वुई गो अहेड.
सुहास हे सगळ ऐकूनच निराश झाला . पण मला नाही वाटत की तुमचा निर्णय कोणाला पटेल.
ज्याला माझे विचार पटतील,निर्णय पटेल त्याच्याशी मी लग्न करेन.
ठीक आहे मी कळवतो तुम्हाला .कॉफी घेवून ते दोघे बाहेर पडले.
काय ग संयु काय म्हणाला आजचा मुलगा?
आई नेहमी सारखेच आणि आता बास मी कोणाला ही येथून पुढे नाही भेटणार.
संयु अस वागशील तर तुझ लग्न कसे होणार ? ती दत्तक घेण्याची अट रदद् करून टाक बाकी समाज कार्य चालू दे तुझ त्याला कोणी हरकत नाही घेणार.
का आई? मला माझ आयुष्य माझ्या नियमांवर नाही जगता येणार का? नुसत समाजकार्य करते म्हणून डिंडोरा नाही पीटवायचा मला तर स्व: ता काही कृति करून दाखवायची आहे.
या समाज कार्या मुळे तुझ लग्न नाही होणार संयु ,आयुष्यभर एकटी राहणार आहेस का?
आई कोणी तरी असेलच ना,जो माझ्या सारखा विचार करणारा असेल? आई गप्प बसली.
असेच काही महीने गेले. ” संयु लक्षात आहे ना आज कॉलेज चे गेट टुगेदर आहे”.
हो स्वाती आहे लक्षात आणि मी वेळे वर पोहचते.स्वाती तिची क्लासमेट तिचा कॉल होता.
आज जवळ जवळ सात/ आठ वर्षा नी सगळे भेटणार होते. काही जनांची लग्न ही झाली होती. संयु मात्र वयाची तिशी आली तरी ही सिंगल होती.
कॉलेज मध्येच सगळे जमनार होते. संयु छान तयार होऊन गेली. एक एक करत सगळा त्यांचा ग्रुप आला. गप्पा मारत मस्त सगळे एन्जॉय करत होते. पण संयुची नजर विक्रांत ला शोधत होती तो अजुन आला नव्हता. दहा मिनिटाने विक्रांत तिथे आला,” हैल्लो गाइज रियली सॉरी जरा लेट झाला. एखादा झंझावात यावा तसा विक्रांत आला. पहिल्या सारखाच हैंडसम दिसत होता ,थोड़ा जाड़ झाला होता. हे संयु कशी आहेस? लुकिंग ब्यूटीफुल ऍज युजवल.
मी मस्त,तू सांग कसा आहेस आणि कुठे होतास? कॉलेज नन्तर भेटला नाहीस पुन्हा.
संयु मी एम बी ए करायला बाहेर गेलो होतो मग थोड़े दिवस तिकडेच जॉब केला. आता सहा महीने झाले बघ इकडे येवून.
सगळे गप्पा मारत जेवण करत होते. संयु आणि विक्रांत दोघेच बसले होते. ” मग विकी लग्न वैगेरे केलेस की नाही”?
नाही संयु अजुन नाही केले.
का रे तुझ्या मागे तर किती मूली असायच्या कॉलेज मध्ये.
संयु ,आयुष्यात प्रेम एकदाच होते आणि नंतर झाले तर ती फक्त तडजोड असते.
अजुन तिथेच गाड़ी अडकली आहे का तुझी विकी?
हो संयु पण मला तू नकार देण्या मागे कारण काय होते ? दूसरा कोणी तुला आवडत होता का?
म्हणजे माझ्या पासून दूर जाण्या साठी तू अँब्रॉड ला गेलास ?
तस समज हव तर पण आता तरी कारण सांग.
विकी,माझी स्वप्न खुप वेगळी होती. काहीतरी हटके आणि थ्रिल असणारे काही करावे ही माझी इच्छा होती. तुला माहीत आहेच मी कॉलेज च्या सगळ्या एक्टिविटी मध्ये भाग घ्यायची.
हो,संयु एकदम बोल्ड आणि बिनधास्त ,आणि हुशार सुद्धा होतीस.
विकी माझ ही प्रेम होते तुझ्यावर पण मग त्यात मी इमोशनली गुंतत गेले असते आणि माझ्या ध्येया पासून विचलीत झाले असते. मला ते नको होते.
पण मी तुला अडकवून नसते ठेवले संयु. तू एकदा बोलली असतीस तर मी तुला साथच दिली असती.
नाही विकी तेव्हा आपण इतके मैच्युर नव्हतो आणि तुला माझे ऐम पटले ही नसते.
संयु मग तू केलेस का लग्न? कोण आहे तो लकी मैन?
नो विकी मी पण नाही केले अजुन लग्न.
का? कोणी आवडला नाही का?
विकी, मी सगळ्याना आवडते पण माझे समाजकार्य आणि माझी एक अट आहे ती कोणाला रुचत नाही म्हणून लग्न करायला कोणी तयार होत नाही आणि तसे ही माझा ही इंटरेस्ट नाही उरला लग्नात.
संयु असे कोणते काम करते तू आणि अट कसली?
मी वेश्या वस्तीत जावून तिथल्या लहान मुलांना शिकवते. महिन्यातुन एकदा त्या स्त्रियांचे हेल्थ चेक अप आम्ही करतो आणि तिथल्याच एका मुलीला मी दत्तक घेणार आहे . मी जगा वेगळे काही तरी चुकी चे काम करते . त्या वस्तीत जाते म्हणजे मी चांगली मुलगी नाही असा लोकांचा समज. माझ्या कामाच कौतुक तर नाहीच होत पण त्यावर शिंतोडे मात्र उडवले जातात.
संयु मग तुझ्या कामाच कौतुक करणारा कोणी असेल तर तू त्याच्याशी लग्न करशील का?
विकी अस कोणी नाही पटकन माझ्याशी लग्न करायला तयार होणार. माहीत आहे मला.
संयु विल यू मैरी मि? विक्रांत तिचा हात पकडत म्हणाला.
विकी,तू ? पण तुला चालेल माझ काम आणि ते दत्तक..संयु विक्रांत ने अचानक प्रपोज केले म्हणून गोंधळली.
हो संयु मला सगळ काही मान्य आहे.
पण तुझ्या घरी चालेल का विकी अशी सुन?
येस कारण माझ्या घरचे इतके ही संकुचित वृत्ती चे नाही आहेत. ते नक्की तुला समजून घेतील.
संयु मग हसतच विक्रांत ला हो म्हणाली.
संयु आय एम सो प्रावुड ऑफ यू ..सोप नसत ग अस वेगळ्या वाटे वरुन चालणे पण मी कायम तुला साथ देइन. तुझ्या सारख जग़ायला मला ही आवडेल.
“जगावे असे की जीवनाचे गाणे व्हावे.
अंधाराला भेदून आपण ही कोणाची सकाळ व्हावे.”