New Fireworks in Diwali : दिवाळीतील नवीन फटाके ..
Source: – FaceBook
या दिवाळीत बाजारात आलेले नवीन फटाके… 😉
१) आन्नारीया : हा फटाका सुरुवातीला सुर्रर्र्र्र असा आवाज करत रोषणाई करतो नंतर एकदम शांत … वाटते सगळा अंधार संपला आता…नंतर लक्षात येते अंधार तसाच कायम
२) केजरबाण : अतिशय डेंजर फटाका …काडी लावून लगेच लांब पळावे….काडी लागायच्या आधीच जोरदार आवाज करत आकाशात जातो….मोठ्ठा आवाज करतो…आणि धप्पकन खाली
येतो…
३) ममता लवंगी माळ : ही छोट्या लवंगी फटाक्याची माळ….ही बारक्या पोरांची फटाकडी म्हणून लोक लावतात…..आणि हिची तड तड थांबतच नाही…..
४) मनमोहन ज्योती : हा एक शांत फटाका …..हा पेटवला कि नुसता प्रकाश देतो आवाज अजिबात नाही.. :))
५) शरद डबल फटाका : हा दोन आवाजाचा फटाका आहे ..पेटवला कि एक आवाज आपल्या जवळ होतो आणि दुसरा दिल्लीत….
६) अजित साप गोळी : याला फटाका का म्हणावे हेच कळत नाही …पेटवले कि वरती नुसता काळा धूर आणि खाली सापासारखे वेटोळे काढत राख राहते ….
७) गडकरी चक्र : हे गोल चक्र कधी कुठे सरकेल सांगता येत नाही…सावध असा…. :)))
८) दिग्विज्योत : हा फटाका नको तेव्हा फुटतो आणि सारखा नकोनकोसे आवाज करतो,
लोकप्रिय नसूनही अजून बाजारात ह्याचे अस्तित्व जाणवते हेच आश्चर्य .
९) कलमाडी कलर : हा फटाका फक्त क्रीडा स्पर्धेपुरता वापरतात. याची किंमत करोड रुपये सांगितली जाते पण रंग आणि आवाज दहा रुपयाचा काढतो, नाकापेक्षा मोती जड असे याचे स्वरूप आहे. हा फटाका विकत घेणे म्हणजे आतबट्ट्याचा व्यवहार. वापरणा-याचे पूर्ण दिवाळे काढतो.
१०) रामदेव रॉकेट : ह्याची करामत पाहायला लोक पहाटे पहाटे मैदानात येतात. कुठल्याही कोनातून वळणारा, संपूर्ण स्वदेशी बनावटीचा, आरोग्यास लाभदायक आणि दुष्ट प्रवृत्तीस मारक असा फटका आहे.
११) जयललिता चिडी : अत्यंत बेभरवश्याचा आणि लावना-याच्याच अंगावर येणारा हा फटाका आहे. शक्यतो वापर टाळावा.
१२) मोदी माळ : लावल्यावर भगव्या रंगाचा धूर येतो, आजूबाजूचे हिरव्या रंगाचे शेवाळ जाळून टाकते, लावणा-याचा पैसा वसूल आणि पूर्ण विश्वसनीय.
१३) राज रांगोळी : फक्त मराठी माणसासाठी वाजणारा हा फटाका ”खळ्ळ खट्याक” असा आवाज काढतो, आणि बाहेरच्यांची दातखीळ बसवतो.
१४) सनी लिओन सुरसुरी : हा फटाका परदेशी आहे, लावल्यावर अंगाशी येतो आणि तऱ्हे-तऱ्हेचे खेळ दाखवतो, खूप महाग असून फक्त महेश भटला परवडतो.