MarathiBoli – Marathi Story and Poem Competition 2022-मराठी कथा आणि कविता स्पर्धा २०२२

1
3532

नमस्कार ,
मराठीबोली कविता आणि कथा लेखन स्पर्धेला तुम्ही उदंड दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्हाला पुन्हा एकदा निकालाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे.
कारण अजूनही अनेक उत्कृष्ट साहित्य जे तुम्ही आम्हाला पाठवले ते आम्ही प्रकाशित करू शकलो नाही.
स्पर्धेसाठी नवीन साहित्य स्वीकारणे ४ एप्रिल रोजीच बंद करण्यात आले आहे.
अजूनही ७-८ कथा तर १८-२० कविता प्रकशित करायच्या बाकी आहेत, त्यामुळेच निकालाची तारीख पुढे ढकलावी लागत आहे.
या स्पर्धेचा निकाल
१ मे महाराष्ट्र दिनी लागेल. ( यात बदल होणार नाही )

******************************************************************आम्ही एका छोट्या स्पर्धेचे आयोजन केले, आणि आपण आपले अनमोल साहित्य आम्हाला पाठवले. यासाठी तुमच्या सर्वांचे आभार.
आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आणि ऊत्तम साहित्य आपण पाठवलेत, त्यामुळे परीक्षकांना उत्तम साहित्य निवडण्यासाठी अजून थोडा वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालाची तारीख थोडी पुढे ढकलावी लागत आहे.
स्पर्धेचा निकाल १६ एप्रिलला १ मे २०२२ ला लागेल.
मराठीबोली.इन संकेतस्थळावर १० एप्रिलपर्यंत स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आलेले साहित्य पोस्ट केले जाईल.
अजूनही कोणाला साहित्य पाठवायचे असेल तर शेवटची ३ दिवसांची मुदत आहे. त्यानंतर आलेले साहित्य कोणत्याही कारणाने ग्राह्य धरले जाणार नाही.
स्पर्धेच्या निकाला सोबतच मराठीबोली इ विशेषांक १६ एप्रिलला मराठीबोली.कॉम वर प्रकाशित होईल.

******************************************************************

नमस्कार मित्रांनो,

सर्व प्रथम आपल्या सर्वांची माफी मागतो, काही अपरिहार्य कारणांमुळे मागील वर्षी दिवाळीत असणारी मराठीबोली.इन ची स्पर्धा आम्हाला पुढे ढकलावी लागली होती. तरी आपल्याला झालेल्या तसदी बद्धल क्षमस्व.

पण मागील वर्षी मराठीबोलीचा इ-दिवाळी अंक प्रसिद्ध होऊ शकला नव्हता तोच या वर्षी २ एप्रिलला म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल.

आपण मागील वर्षी आपले लेख/कथा/कविता पाठवल्या होत्या, त्या आम्ही कुठेही प्रकाशित केलेल्या नाहीत.या आधी आपण जर मागील स्पर्धेसाठी कथा/ कविता पाठवल्या असतील, तरी कृपया आता त्या पुन्हा पाठवाव्यात, त्या संबंधित माहिती तुम्हाला इमेल वर मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क (social@marathiboli.in)

MarathiBoli – Marathi Story and Poem Competition 2022

या वर्षीच्या स्पर्धेचे नियम आधी प्रमाणेच आहेत.

*स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
कथा/ कविता / लेख पाठवण्यासाठी इमेल – social@marathiboli.in

कथा स्पर्धा
१. कमीत कमी १००० शब्दांची असावी.
२. विषयाचे कोणतेही बंधन नाही. (बालकथा नसाव्यात )
३. शुद्धलेखनाच्या किंवा टायपिंग चुका नसाव्यात
४. कथा या आधी कुठेही प्रकाशित नसावी .

कविता
१. कमीत कमी ३ कडवी असावीत.
२. विषयाचे कोणतेही बंधन नाही.
३. शुद्धलेखनाच्या किंवा टायपिंग चुका नसाव्यात
४. कविता या आधी कुठेही प्रकाशित नसावी .

कथा/ कविता पाठवण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०२२. ४ एप्रिल २०२२
निकालाची तारीख – २ एप्रिल २०२२ १६ एप्रिल २०२२ १ मे २०२२
कथा/कविता फक्त वर्ड फॉरमॅट मध्ये पाठवावी किंवा मराठीबोली.इन वर लिहावी. PDF/JPEG स्वीकारली जाणार नाही.

कथा किंवा कविता इमेल वर पाठवताना SUBJECT मध्ये MB2022V1 लिहावे.

स्पर्धेचा निकाल

स्पर्धेसाठी पात्र कथा/कविता मराठीबोली.इन वर आपल्या नावासह प्रकाशित होतील. प्रकाशित झाल्यावर पहिल्या ७ दिवसात संकेतस्थळावर मिळणाऱ्या अभिप्रायानुसार गुण दिले जातील. हे गुण सातव्या दिवशी त्याच कथेच्या/कवितेच्या शेवटी प्रकाशित होतील.
१. ७ दिवसात मिळालेले एकूण व्हिव्ज X २ गुण
२. सोशल नेटवर्क वरील लाईक X २ गुण
३. वाचकांच्या प्रतिक्रिया/कंमेंट्स X ५ गुण

या वरून ५०% गुण दिले जातील तर ५०% गुण हे मान्यवर परीक्षकांकडून दिले जातील.

निवडलेल्या कथा मराठीबोली इ अंकात प्रकाशित केल्या जातील. काही विशेष कथा/कवितांचे वाचन आमच्या युट्युब वाहिनीवर लेखकाच्या नावासह केले जाईल.

१. १५०० (५०० * २, ३००,२००) रुपये किमतीची कुपन, ज्याद्वारे आपण आपल्या आवडीची पुस्तके विकत घेऊ शकता.
२. १००० (५००,३००,२००) रुपये किमतीची कुपन,
३. ५०० (३००, २००)रुपये किमतीची कुपन.
दिवाळी अंकात प्रकशित प्रत्येक कथेला १०० रुपयांचे कुपन.

कविता स्पर्धा

१. १००० (५००,३००,२००) रुपये किमतीची कुपन, ज्याद्वारे आपण आपल्या आवडीची पुस्तके विकत घेऊ शकता.
२. ५०० (३००, २००) रुपये किमतीची कुपन,
३. ३०० (२००, १००)रुपये किमतीची कुपन.

एका पेक्षा अधिक कथा किंवा कविता पाठवू शकता.
कुपन वापरताना कोणतीही कमीत कमी किंमत असणार नाही, फक्त एकूण रक्कम कुपन रक्कमेपेक्षा जास्त असावी.
म्हणजेच ५०० रुपयाचे कुपन आपण ५०१ रुपयाच्या खरेदीसाठी वापरू शकता. आपल्याला ५०१ रुपयांची पुस्तके फक्त १ रुपया भरून मिळतील.
एका ऑर्डरसाठी एकच कुपन वापरता येईल.
स्पर्धेचा निकाल दिल्यानंतर ४८ तासात कुपन ई-मेल वर पाठवण्यात येतील. कुपन ४५ दिवसांसाठी वैध असतील.
काही अपरिहार्य कारणांमुळे जर कुपन उपलब्ध करता आले नाहीत तर संपूर्ण बक्षिसाची रक्कम गुगल पे, ऍमेझॉन कुपन अश्या पद्धतीने देण्यात येईल.
कथा/ कविता / लेख पाठवण्यासाठी इमेल – social@marathiboli.in

याच सोबत चित्रपट, वेब मालिका , अभिनेते , अभिनेत्री यांच्या विषयी म्हणजे एकूणच मनोरंजन क्षेत्राविषयी ज्यांना लिहण्याची आवड आहे. ते सुद्धा लेख पाठवू शकतात, हे लेख आमच्या नवीन संकेतस्थळावर(haltichitre.com) प्रकाशित होतील. ( प्रत्येक प्रकाशित लेखाला २५-२०० रुपये मानधन मिळेल )

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here