Marathi Kavita – चला रे वीरांनो चौंडीला जावूया…
३१ मे १७२५ म्हणजे जागतिक इतिहासात एक आदर्श राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती दिवस ! या दिवशी महाराष्ट्रातील चौंडी येथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. आजही हजारो अहिल्याप्रेमी ३१ मे ला चौंडी येथे अहिल्याजन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी जमतात. त्याच दिवसावर (३१ मे) लिहिलेली ही कविता – ‘चला रे वीरांनो चौंडीला जावूया’
चला रे वीरांनो चौंडीला जावूया…
अहिल्या गौरव गाऊनी,
वंदन राजमातेस करूया
जागर तेथे मांडूनी,
विचार मंथन घडवूया
अहिल्यादेवींच्या कार्यांचे,
स्मरण तेथे करूया
सत्य इतिहास जाणूनी,
प्रेरणा त्यातून घेवूया
स्त्री शक्तीचा महिमा,
अवघ्या जगास सांगूया
जाण कर्तृत्वाची ठेवूनी,
आदर्श जगण्याचा घेवूया
झेंडा हाती घेवूनी,
उंच आकाशी मिरवूया
माती भाळी लावूनी,
नतमस्तक तेथे होवूया
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)
मिलिंद सर खूप छान कविता बनवली आहे.