Ashach Eka Betavar : अशाच एका बेटावर

1
10072

Ashach Eka Betavar : अशाच एका बेटावर

पुणे 52 चित्रपटा नंतर मराठी रसिकांच्या समोर येणारा अशाच एका बेटावर हा आणखी एक रहस्यमय हॉरर चित्रपट.

९ अनोळखी व्यक्ति..

एक निर्मनुष्य बेट…

एक कारण ….. भयानक रहस्य…

अशाच एका बेटावर….

ashach-eka-betavar

मिटल्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांना पंख देणारी मायानगरी …. मुंबई

याच मायनगरीतून नऊ अनोळखी व्यक्ति निमनुष्य बेटावरच्या एकाकी बंगल्यात गूढ रहस्याचा शोध घेण्यासाठी एकत्र येतात .तेथे त्यांच्या भोवती अनोळखी थरारक घटनांची मालिकाच सुरू होते. या घडणार्‍या घटनांचे मूळ या प्रत्येकाच्या गतायुष्यात घडलेल्या घटनांवर आधारित असते . प्रत्येक नवीन रात्र नवीन रहस्याला जन्म देते आणि यातूनच भयचकीत करणार्‍या अनपेक्षित घटना घडत जातात. रहस्याचा खिळवून ठेवणारा थरारक प्रवास रसिकांसमोर येत आहे ८ फ्रेब्रुवारी रोजी…

अलिबागच्या निसर्गरम्य परिसरात चित्रित झालेल्या या चित्रपटात आपल्या समोर येत आहेत अंकुश चौधरी, संजय नारवेकर, संजय मोने, शरद पोंक्षे, यतीन कारेकर, सई ताम्हणकर, मधुरा वेलणकर, मंगेश देसाई, कमलेश सावंत..

चित्रपटात सई ताम्हणकर, ‘नो एंट्री पुढे धोका आहे‘ नंतर पुन्हा एकदा हॉट लुक मध्ये रसिकांच्या समोर येत आहे, चित्रपटात सई ने एका बार डांसर ची भूमिका केली आहे..

हॉरर, रहस्यमय चित्रपटात जो गरम मसाला आवश्यक असतो त्यासाठी सई एकदम परफेक्ट बसते…चित्रपटात फक्त तीनच गाणी आहेत आणि त्यातील दोन गाणी सई वरच चित्रित कण्यात आली आहेत…

marathi-movie-ashach-eka-betavar

चित्रपटाच्या प्रोमोस वरुन १९६५ सालच्या गुमनाम चित्रपटाची आठवण होते, पण हा चित्रपट वेगळा आहे असे चित्रपटाचे दिग्दर्शक संजू हिंगे सांगतात…

अशाच एका बेटावर हा चित्रपट अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘And there were none’ या कादंबरीवर आधारित आहे…

तर या ९ जणांचे बेटावर काय होते?

कोण बोलवते यांना या बेटावर…

यांच्या पैकीच कोणी एक की अजून कोणी..

अश्या अनेकप्रश्नांची उत्तरे आपल्याला ८ फेब्रुवरी रोजी आपल्याच जवळच्या चित्रपटगृहात मिळती…

ashach-eka-betavar-marathi-movie

पाहायला विसरू नका .. अशाच एका बेटावर…रहस्यमय मराठी चित्रपट..

[tube]9WInyVNlffc[/tube]

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here