Sai Tamhankar (सई ताम्हणकर)

6
2471

‘या गोजिरवाण्या घरात’, ‘अग्निशिखा’ ‘साथी रे’, ‘कस्तुरी’ अशा मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणारी सई ताम्हणकर सुभाष घईंच्या ‘ब्लॅक एन्ड व्हाईट’ तसेच ‘गजनी’ या सिनेमांमध्ये दिसली. त्यानंतर सुभाष घईंच्या ‘मुक्ता आर्टस’च्या ‘सनई चौघडे’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिकेत ती दिसून आली व तिचा या क्षेत्रातला प्रवास खर्‍या अर्थाने सुरु झाल असं म्हणायला काही हरकत नाही कारण यानंतर सईने ‘पिकनिक’, ‘बे दुणे साडे चार’, ‘रिटा’ अशा अनेक चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अशीच एक वेगळी भूमिका तीने साकारली आहे ‘झी मराठीवरील अतिशय लोकप्रिय आणि वेगळ्या विषयावर आधारित ‘अनुबंध’ या मालिकेमध्ये.

तुझी या क्षेत्राची निवड . . .आवड कि करिअर?
–  मला या क्षेत्रात मा़झं नशीब घेऊन आलं असं मला वाटतं. कारण १२ वीत असताना मी माझं पहिलं नाटक केलं. अनेक आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धांमध्ये मी नंतर भाग घेतला. मला ते वातावरण खूप आवडलं आणि मी या क्षेत्रात करिअर करायचं नक्की केल.

अनुबंध मधल्या तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील. 
– ‘अनुबंध’ची कथा मला खूप आवडली. त्यामुळे मी ती मालिका स्विकारली. या मालिकेतल्या माझ्या भूमिकेबद्दल सांगायच तर मी जी भूमिका केली तशी मी बिल्कुल नाही. त्या मालिकेतल्या आश्विनीमध्ये आणि सई मध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. दोघी एकमेकींपेक्षा एकदम वेगवेगळ्या आहे. यातली अश्विनी साकारताना मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण व्हायची इन्फॅक्ट मी जेव्हा ती भूमिका समजून घेण्यासाठी स्क्रिप्ट वाचत होते तेव्हा मला एकदम तिचीच आठवण झाली. ती अगदी आश्विनी सारखी आहे. मी पूर्णपणे आश्विनीसारखी नसले तरी तिचा थोडाफार अंश माझ्यात आहे कदाचित त्यामुळे मी आश्विनी साकारु शकले.

‘ब्लॅक एन्ड व्हाईट’ आणि गजनी’ या चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?
– बॉलिवुड मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. सुभाषजींसोबत मी ‘ब्लॅक एण्ड व्हाईट’ करत असताना ते ‘सनई चौघडे’ वर काम करत होते. मी मराठी असल्याने त्यांनी मला विचारणा केली व ‘सनई चौघडे’ मधला सईची भूमिका मला मिळाली.

कॉलेज लाईफ मध्ये तू नाटकात काम केलं होत. पण आता तुला नाटकात काम करायला आवडेल का?
–  ‘सनई चौघडे’ नंतर मी असं ठरवलं होतं की मी आला मालिकांमध्ये अडकणार नाही. तरीपण ‘अनुबंध’ सारखी चांगली कथा आणि वेगळी भूमिका मिळाल्याने मी ती मालिका स्विकारली तसचं जर नाटकाच एखादं चांगलं कथानक आणि मी साकारु शकेल अशी भूमिका मिळाली तर मी नाटकात नक्की काम करेन. पण खर सांगू का मला ते नाटकाचे दौरे करायचे म्हटलं की थोड टेन्शन येत.

‘मिशन पॉसिबल’ या तुझ्या आगामी चित्रपटातल्या भूमिकेबद्दल आणि अनुभवाबद्दल काय सांगशील…?
 मी खूप दिवसांनी एक न्युट्रल भूमिका साकारत आहे. या चित्रपटात काम करताना खूप एन्जॉय केला. पुष्कर खूप मेहनती आहे. संजय खानझोडें, एकूणच आमची ‘मिशन पॉसिबल’ची पूर्ण टीम  . .  आम्ही सर्वांनीच खूप मेहनत घेतली आहे. खूप नवीन माणसं भेटली त्यांच्याकडून खूप काही नवीन शिकायला मिळालं.

सई चे काही खास फोटो पाहण्या साथी येथे क्लिक करा..

 

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here