Marathi Kavita – Dr. Babasaheb Ambedkar – डॉ .बाबासाहेब आंबेडकर
कवयित्री – रुपाली
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांची गाऊ नका फक्त गाणी
त्यांचे चरित्र वाचा आणि व्हा त्यांच्या समान सर्वांनी
मेहनत जिद्द, चिकाटी आणा आपल्या मनी
तेव्हाच गा आंबेडकरांची गाणी….
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची किर्ती होती खूप थोर
कारण होते ते अख्या भारताचे शिल्पकार.
म्हणूनच लोक करती त्यांची जयजयकार
होते ते दलीत समाजाचे आधार…
चवदार तळ्यांची होती एक कहाणी
तहान लागून सुद्धा दलितांना घेता येत नसे तिथन पाणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले देवासारखे
मिळवून देऊनी दलितांना त्यांचे हक्क लिहिली नवी कहाणी….
Rupali wadhai :- b.com 1st year in Kamala neharu college nagpur..