News – Get Well Soon Vilasrao Deshmukh – विलासराव देशमुखांवर लवकरच होणार शस्त्रक्रिया

0
1099

Get Well Soon —- Vilasrao Deshmukh

vilasrao deshmukh
vilasrao deshmukh

राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे आज दुपारी चेन्नईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. यकृत व मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असलेल्या विलासरावांवर चेन्नई येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. विलासरावांच्या निधनामुळे देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदे व सुसंस्कृत व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

चेन्नईतील ग्लोबल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणा-या केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव देशमुख यांच्यावर लवकरच यकृत आणि मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. चेन्नईत शनिवारी एका अपघातात ब्रेनडेड झालेल्या एका ३१ वर्षीय वाहनचालकाचं यकृत आणि मूत्रपिंड विलासारावांना देण्यात येणार असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र याबाबत ग्लोबल रुग्णालयातील सूत्रांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

चेन्नईत अपघातात जखमी झालेल्या ड्रायव्हरचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. त्या वाहनचालकाचा आणि विलासरावांचा रक्तगट समान असल्याने त्याचे यकृत आणि मूत्रपिंड विलासरावांना देण्यात येणार आहे.

यकृत व दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे विलासराव देशमुख यांना गेल्या आठवड्यापासून चेन्नईतील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. यकृत प्रत्यारोपणासाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मोहम्मद रेला यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक विलासरावांवर उपचार करत आहेत. डॉक्टरांनी विलासरावांच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्यांच्यावर त्वरीत यकृत आणि मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here