जिगोलो – रेड लाईट एरिया – Marathi Katha Jigolo Red Light Area

1
4292

Marathi-Katha-Jigolo-Red-Light-Area
लेखक : निल राठोड
संपर्क : nilrathod420@gmail.com

जिगोलो – रेड लाईट एरिया – Marathi Katha Jigolo Red Light Area

डिग्रीचे वर्ष सरत होतं आणि शरिरात काहीतरी करण्याच रक्त सळसळत होतं..! पण सुरवात जरी करायचा विचार केला तरी घरचे म्हणायचे “बाळा, तु राहुदे… तुझ्याने नाही होणार..! ना घरामध्ये ना बाहेर… अशी कोणतीच व्यक्ती नव्हती. जी म्हणेल कि रोहन proove urself… I M OLWeZ WiD Uu… बट नो चान्स.., जेव्हा आयुष्याचे” L” लागायची वेळ यायची तेव्हा ते चहूबाजूंनी लागायचे, मग घंटा आपण काहीच करू शकत नाही. हि भावना मनामध्ये उत्पन्न व्हायची. पण म्हणतात ना जेव्हा आपले नातेवाईक किंवा जवळचे मित्र हात सोडतात.. तेव्हा अनोळखी लोकंच आपल्यावर विश्वास दाखवतात. चार महिन्यांपूर्वी फेसबुकवर ओळख झालेल्या विशालचा मॅसेज माझ्या मॅसेंजर ला ब्लींक करत होता.

काही दिवसांपुर्वी विशालच ब्रेकअप झालेलं.. तेव्हा आमची जास्त ओळखही नव्हती तरीही त्याने मला मॅसेंजर ला कॉल केला. एखाद्या अनोळखीवर विश्वास टाकायला खूप गट्स लागतात… त्याने ते गट्स दाखवले होते. मला फोन करून तो टाहो फोडून रडत होता.. मी खूप जवळच्या मित्रासारखं त्याला समजावल होतं. त्याला जे झालं ते विसरून नव्याने नवीन स्वप्नांच्या मागे लागण्याचे बजावले होते, त्यालाही माझे म्हणणे पटले होते. त्या दिवसापासून अनोळखीतून एक मैत्रीच नात जन्माला आले. आता ह्याक्षणी मला त्याची खूप आठवण झाली. भराभर फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट ओपन करून त्याचा नंबर शोधून काढला. काही सेकंद फोनची रिंग वाजत होती मग फोन उचलला गेला.
“हॅलो,
‘हां कोण?
‘विशाल, विशाल मी…. मला ओळखले नाहीस का?
“कोण… रोहन…??
“हां रोहन पाटील…!
” काय झालं रे… आज अचानक कॉल केलास….,!
“कारणही तसच आहे रे.!
” अरे रोहन… बोल ना काही प्रॉब्लेम झालाय का.,?
“विशू मी मुंबईला यायचा विचार करतोय रे… तु मला मदत करशील का..?
“अरे मग ये ना… विचारतोयस काय?
” पण मी कायमस्वरूपी येणार आहे… चालेल का तुला?
“अरे न चालायला काय झालं…? तु काय मला जड होणार आहेस का… ‘ये तु कधीही… मी वाट पाहीन तुझी!
विशाल चा फोन कट झाला आणि मनाला हायसे वाटू लागले! दुसय्राच दिवशी मी मुंबईला रवाना झालो.

दोन दिवस उलटून गेले, विशालने जेमतेम मुंबईचा हरएक कानाकोपरा दाखवून दिला. ह्यात विशेष मला ते रेडलाईट एरियाचच वाटलं.. कसं कुणी पैशासाठी देहविक्री करत असेल हा विचार माझ्या मनात सारखाच घोळत होता. मला असल्या फंद्यात नाही पडायचा मग मी तो विचारच सोडून दिला. आपण मुंबईला चांगल काम करायला आलोय. नको त्या दिशेकडे न भरकटता मी माझं लक्ष एका दिशेला स्थित केलं.

आता मुंबईमध्ये आल्यावर मी खूप सारे इंटरव्ह्यूज दिले. पण सगळ्यांनाच जॉब एक्स्पिरींयस हवा होता.. आणि मला घंटाचा एक्स्पिरींयस नव्हता. So wiLL call you इतकच इंटरव्ह्यूजला ऐकायला मिळायचं. काही दिवसांनी मला पिक्चरमध्ये काम करायचं वेड लागलं. मग मी त्या क्षेत्रात आपलं लक आजमवण्याचा प्रयत्न करू लागलो.
राजेश शिंदे यांच्या पहिल्याच”कानुन” अशा हिंदी चित्रपटात मला हिरोइनच्या बॉडीगार्डचा एक मिनिटे तिस सेकंदाचा रोल मिळाला. माझा चेहरा एखाद्या हिरोसारखा होता. आणि मला हिरोसाठी प्रयत्न करायचे होते. मी केलेल्या एक मिनिटे तिस सेकंदाचा रोल लोकांना खूपच आवडला. मला तेव्हा खूप सारा रिस्पॉन्ससुध्दा मिळाला.

त्यानंतर मला खूप सारे प्रोजेक्ट मिळू लागले जे साईड हिरो किंवा हिरोइनच्या भावाच्या किंवा हिरोच्या भावाचे रोल होते त्यात काही हिरोच्या मित्राच्या रोलचे सुध्दा होते. मला हिरोचाच रोल करायचा असल्यामुळे मी ते सगळे प्रोजेक्ट रद्द केले. काही दिवसानंतर मला एका सी ग्रेड पिक्चरमध्ये हिरोच्या रोलची ऑफर आली. ज्या पिक्चरमध्ये मला मेन लिड रोल तर दिला होता पण त्यात जे काम करायचे होते त्याला माझे मन धजत नव्हते. “वासना” नावाचा तो पिक्चर होता ज्यात मला सेक्स सिन्स द्यायचे होते. लिड रोल मिळतोय म्हणून तो पिक्चर करावा, तर आपल्या नावाला बट्टा लागेल आणि परत त्याच धर्तीचे सिनेमे मिळू लागले तर आपण सिनेमात फक्त सेक्स सिन्स साठीच फेमस होऊन जाऊ… असा विचार मनात येत होता…

नो… नो रोहन.. मला हे मुळीच पटत नाहीये. तो एक सिनेमा करून तु स्वतःच आयुष्य बरबाद करून घेणार आहेस का? अरे हि इंडस्ट्री आहे, आज त्यांना बकरा हवाय हलाल करायला म्हणून तुझा वापर करत आहेत. एकदा का तु हलाल झालास कि मग तुझ्याकडे ढुंकूनही कुणी पाहणार नाही. – विशाल
“विशू’तु ओव्हर पसेझिव्ह होतोयस. आय नो तुला माझी काळजी आहे. पण मला माझं लक एकदा आजमावून तरी बघू दे. आणि अ‍ॅक्टींग हि अ‍ॅक्टींगच असते ती सी ग्रेड मध्ये केली काय आणि ए ग्रेड मध्ये केली काय.. फार काही वेगळ नसत रे..!-रोहन
” हो ना… सर्व सेमच असत ना…? मग एक काम कर ना मरिन लाईन ला हातात रूमाल बांधून उभा रहा ना.. ह्या फिल्म मध्ये जे कौशल्य दाखवायचं आहे तेच तिथे दाखवं.. तुला इथे टेक घ्यावे लागतील रे.. तिथे एका रात्रीत पुर्ण पिक्चर तयार होतो.
“विशालऽऽऽ खूप जास्त बोलतोयस तु…,
“का रोहन..? उघड उघड बोलल्यावर तुझ्यातल्या कलाकाराचा अपमान झाला ना? मग मी काय चुकीचं बोललो रे..?
“विशाल… तु आता गप्प बस्स… मला माझं चांगलं वाईट बरोबर कळतं.
” गुड… म्हणजे शेवटी मैत्रीच्या नात्याची काय लायकी असते हे तु सिध्द करून दाखवलेसच.. पण एक लक्षात ठेव मिस्टर रोहन पाटील. आता तु वेडा झालायस पहाटे पडलेल्या स्वप्नांनी… तु ते स्वप्न खरं समजून त्यात रंग भरायचा प्रयत्न करतोयस… पण जेव्हा ते रंग उडून जातील… तेव्हा तुला पश्चाताप होईल..! आणि तेव्हा तुझ्यासोबत हा विशाल पंडीत नसेल.

“ओहहह रिअली.. हाऽऽऽऽहाऽऽऽहा… विशाल… इट्स मी… द वन अँड ओनली रोहन पाटील… बापाला बाप कसं बनायचं… हे तु तरी शिकवू नकोस… मला तुझी गरज नाहीये… कळतय का तुला…. ह्या रोहनला तुझी गरज नाहीये.
” ते एक अर्थी बरच झालं रे.. म्हणजे आता तुला माझ्या रूमची पण गरज नसेल… नाही का?
“डोन्ट वरी… जातोय मी.!

रोहन विशालच्या घरातून तर निघाला पण आता इथून पुढे जाणार कुठे हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न उद्भवला होता.. पण तरीही त्याला मनातून फार वाईट वाटत होते. आपण आपल्या मित्राला दुखावले… ज्याने मुंबईत आपल्याला राहायला जागा दिली… जेव्हा आपले जवळचे हात सोडून गेले. तेव्हा मोठ्या विश्वासाने त्याने पाठीवर थाप दिली. आज त्याच मित्राला आपण वाईट साईट बोलून दुर केले. पण आता या गोष्टीचा विचार करूनही काहीच फायदा नव्हता.

रोहन टॅक्सी पकडून मुंबई सेन्ट्रल च्या दिशेने निघाला. वाटेत आता त्याला त्याच्या भविष्याची काळजी लागून राहीली होती. मुंबईत आपलं असं कुणीच नव्हतं… एक जिवाभावाचा मित्र होता त्यालासुध्दा आपण आज दुर केले. मग आता आपलं पुढे काय होणार…. विचारात मग्न असताना अचानक त्याचे लक्ष बाहेर फुटपाथवर झोपलेल्या लोकांकडे गेले. उद्या आपल्यावर हि वेळ येणार नाही ना.? या विचारानेच त्याचे मन थरथर कापू लागले. पण इतक्यात मुंबई सेन्ट्रलच्या आराधना थिएटर बाहेर टॅक्सी जाऊन थांबली. ब्रेकच्या कर्कश आवाजाने रोहन भानावर आला… टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन तो शुटींगच्या स्थळी पोहचला. दुपारी बारा पासून रात्री तिन पर्यंत त्याने त्या वासना चित्रपटाचे शुट पुर्ण केले.
शुट पुर्ण झाल्यावर रोहन आता रात्रीच्या राहण्यासाठी लॉज कुठे मिळतय का ते पाहत होता. मनात लॉजची व्यवस्था कशी होईल याचा विचार चालू असतानाच फाटकातून एक अ‍ॅम्बेसिडर कार त्याच्या बाजूला येऊन थांबली. “कोण असावी हि व्यक्ती..?” हा विचार करत असतानाच गाडीची काच खाली झाली. त्या व्यक्तिला पाहून रोहन आश्चर्यचकित झाला. “मिरा कर्णिक…’आताच शुट झालेल्या चित्रपटाची नायिका. मिरा जेमतेम तिस-पस्तीस वर्षाची असेल.. सावळा पण रेखीव रंग.. तिच्या ओठावरची डार्क पिंक लिपस्टीक उठून दिसत होती… ब्लॅक कलरचा मिडी ड्रेस आणि हाई हिल्स तिला मॅच करत होते. केसाला काही भागापुरते लावलेल्या सोनेरी कलरच्या रंगाने एक लुक प्राप्त झाला होता. प्रत्येक बॉडीपार्ट तिचा दगडात कोरलेल्या मुर्तीसारखा वाटत होता. द पर्फेक्ट फिगर्स स्ट्रक्चर तिला पाहून लागल असावं असं वाटत होतं. रोहन भराभर तिच्या सौंदर्याच निरिक्षण करत असताना तिच्या चुटकी वाजवून हॅलो बोलण्याने भानावर आला. “ओहहह सॉरी..
” इट्स ओके… कम आय विल ड्रॉप यु…”
” नाही.. नाही.. नको मी जाईन… तसंही मी जवळच कुठल्यातरी लॉजवर जाणार आहे.,
“ओ मिस्टर आता रात्रीचे साडेतिन वाजलेत… ह्यावेळी तुम्हाला लॉज काय.. एक पानपट्टीचं दुकानसुध्दा उघडे भेटणार नाही.
तिच्या बोलण्याने रोहन आता काय करायचा हा विचार करू लागला..
तितक्यात तिच पुढे बोलू लागली.
इफ यु डोन्ट माईन्ड देन तु माझ्या घरी येऊ शकतोस… माझं घर तसही मुंबईच्या मानाने एखादा राजवाडाच आहे. सो तुला त्रास नाही होणार..हवं तर तु उद्या सकाळी निघून जा.. तिच म्हणण एका अर्थी पटत होतं. पण काहीतरी बोलून विषय टाळता येतोय का ते तो पाहू लागला..”अहो पण तुमच्या घरातल्यांना मी आलेलो चालणार नाही.
” डोन्टवरी मी एकटीच राहते.. असं बोलून तिने कारचा दरवाजा उघडला… मग नाईलाजाने रोहनला तिच्यासोबत जाणे भाग पडले…

“नो मॅम… दिज इज नॉट अ राईट.. अँड आय रिअली डोन्ट लाईक इट..!
मी ह्याकरता मुंबईला नाही आलो. माझं लक्ष क्लिअर आहे. माझ्या आयुष्याच्या वाटेत किती जरी खाच खळगे आले तरी मी भरकटणार नाही. मला या जगात सन्मानानं जगायचं आहे. सी ग्रेड पिक्चरमध्ये काम करणे हि माझी हौस नव्हती. माझी मजबुरी होती ती… तुम्ही मला चुकीचं समजत आहात..!-रोहन

बरं… मी चुकले असेल तुला ओळखायला, पण रोहन माझ्यात काय कमी आहे. माझ्या या रूपाचे कैक वेडे आहेत. हे असं सौंदर्य तुझ्यापुढे लोळण घेत असताना तुला नकोसं झालयं?-मीरा

मीरा जी.. मी आयुष्यात काहीतरी ठरवलय. जोवर माझं ठरवलेल लक्ष पुर्ण होत नाही. तोवर मला अशा कोणत्याच गोष्टीत फसायच नाहीये. ज्यामुळे मी मागे ओढला जाईन.

बरं रोहन… मी तुझ्या स्वप्नांमध्ये नाही येणार. पण जेव्हा तुला कधी माझी गरज लागेल. तु खुशाल माझ्याकडे येऊ शकतोस. या घराचे आणि माझ्या ह्रदयाचे दोन्ही दरवाजे तुझ्यासाठी खुलेच असतील.-मीरा
यासाठी मी आपले आभार मानतो, आणि सॉरी मला आता निघावे लागेल.

कळत नव्हत माझ्याच आयुष्यात का असं होतंय. हवी असणारी नाती अचानक तुटत चालली आहेत. मागे फिरायचं ठरवलं तरी मागेसुध्दा माझं असं कुणीच उरलं नाहीये. आता पुढे जाण्याशिवाय गत्यंतरही नाहीये.

“वासना” पिक्चर रिलीज होऊन चार आठवडे झाले. पिक्चरला हवी तशी पब्लिसिटी नाही मिळाली. प्रोड्युसर ने रोहनचे सर्व पैसे बुडविले. त्याला आता कोणत्या पिक्चरची ऑफरही येण बंद झाल्या होत्या. जे प्रोजेक्ट तो करणार होता तेही काही कारणाने रद्द झाले. रोहनला काय कराव तेच कळत नव्हते. तो हॉटेलच्या रूममध्ये स्वतःला तिन-तिन, चार-चार दिवस बंद करून बसे. बाहेर पडल्यावर सर्व जग त्याला हसताना दिसतय अस त्याला वाटे. एक उभरता तारा उभरण्याचा प्रयत्न करत असतानाच निखळून पडला होता. रोहन ला निर्माते-दिग्दर्शक काम देण्याचे टाळत होते. रोहन पुर्णपणे हताश होऊन बसला होता. त्याच्याजवळ असणारे पैसेही आता संपले होते. हॉटेल मालकाने त्याला बाहेर काढले. आता तो फुटपाथवर राहून कसेबसे दिवस ढकलत होता.

मीराच्या वाट्याला खूपसारे पिक्चर्स आले होते. वासना पिक्चरमधील तिचा बोल्डनेस प्रेक्षकाना खूप आवडला होता. त्या संध्याकाळी बांद्रा ला शूट झाल्यावर ती तिच्या कारने घरी जात असताना रस्त्यात तिला कुणीतरी ओळखीच दिसलं. तिने कार रस्त्याच्या कडेला पार्क करून ती बाहेर आली. समोर रोहनला बसलेला पाहून ती स्तंभितच झाली. मळलेले कपडे आणि वाढलेली दाढी ह्यांमुळे रोहनला ओळखणे मुश्किल होत होते. दोन महिन्यांपूर्वीचा रोहन आणि आताचा रोहन यात जमिन आसमानाचा फरक जाणवत होता. कितीतरी वेळ दूरून निरिक्षण करणारी मीरा आता रोहनच्या जवळ गेली.

“रोहन.. अरे रोहन काय अवतार केलायस तु स्वतःचा?
आणि रस्त्याच्या कडेला का बसलायस.??
“मीरा मी हारलो गं… मीरा मी पुर्णपणे हारलोय. रस्त्यावर आलोय गं मी.! कुणाला पिक्चर्स नाही करायच माझ्यासोबत… विशू बरोबर बोलत होता.. या इंडस्ट्रीमध्ये कोण कुणाच नसतं… मला तेव्हा विशूचं ऐकायला हवं होतं… असं बोलून रोहन धायमोकलून रडू लागला.
“अरे रोहन रडू नकोस… मी आलेय ना आता… सर्व ठिक होईल.. आपण पुन्हा नव्याने सुरवात करू… आणि मला माझा आत्मविश्वास सांगतोय. तु नक्कीच यशस्वी होशील! मीराच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत असलेल्या रोहनला मीरा समजाविण्याचा प्रयत्न करत होती. रोहन शांत झाल्यावर ती रोहन ला घेऊन तिच्या घरी निघाली…

“मीरा… आज वाटतयं मी तेव्हा तुझं ऐकायला हवं होतं. त्यावेळी जर मी तुझं ऐकलं असत तर आज माझ्यावर हि अशी वेळ आली नसती.
” अरे रोहन… वेडायस का तु.?
बघ मी तुला म्हणले होते ना माझ्या घराचे आणि ह्रदयाचे दोन्ही दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच खुले असतील. तु कधीही त्यात प्रवेश करू शकतोस… कुणीही तुला अडवणार नाही.
रोहनला रडताना पाहून मीराला त्याचं रडण बघवलं नाही. तिने त्याच्या केसातून हळूवार हात फिरवत…. त्याच डोकं मांडीवर ठेवून ती त्याला गोंजारू लागली.
“रोहन यु आर रिअली स्ट्राँग बच्चा… डोन्ट बिहेव्ह लाईक अ लुजर्स…
पाठीवरून फिरणारा मीराचा हात रोहनच्या छातीशी येऊन थांबला. दुसय्राच क्षणी मीरा थोडीशी खाली झुकून तिने हळूच रोहनच्या मानेवर चुंबनाचा स्टॅम्प लावला. त्या ओठाच्या स्पर्शाने रोहनच्या सर्वांगावर मोरपीसं फिरू लागले. अंगावर शहारे उठल्यावर त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीशी थांबलेला मीराचा हात घट्ट करत रोहन ने थोडसं वर उठत तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. मीराने साडी नेसल्यामुळे तिच्या पोटाचा काही भाग उघडाच राहिला होता. रोहनचे तिकडे लक्ष जाताच त्याने त्याच्या ओठांचे ठसे बेंबीवर टेकवले. तिला दोन्ही हातांनी उचलून तो बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागला. चुक कि बरोबर काही कळायला तिथे मार्गच नव्हता. जे काही घडत होते ते इतक्या वेगाने घडत होते कि दोघांच्याही विचार करण्याची क्रिया काही काळासाठी थांबून गेली होती.
रोहन मीराला मिठीत घेऊन बेडरूममध्ये आल्यावर मीराच्या ओठावर एक स्मितहास्य फुलून गेलं. तिला जे हवं होतं ते मिळाल्याच समाधान तिच्या चेहय्रावरून ओघळत होतं.

ती रात्र आयुष्याच्या वाटेवर एक नवा आलेख मांडून गेली. त्या रात्रीनंतर ते रोजचच होऊन गेलं… प्रेम कि वासना याचा थांगही आता लागत नव्हता… पण आता दोघही सर्व बंधने तोडून शरिराने एकमेकाच्या खूप जवळ आले होते. एक मैत्रिण… एक प्रेयसी… एक बायको… हि सर्व नाती मीरा हसत हसत पार पाडत होती. रोहनला स्ट्राँग बनविण्यासाठी ती हर तर्‍हेचे प्रयत्न करत होती. खूप साय्रा निर्मात्या दिग्दर्शकांकडे ती रोहनला घेऊन जात होती. पण रोहन आता आधीसारखा उत्साह दाखवत नव्हता. कसल्याशा ओझ्याखाली तो दबला जात होता. मीराने त्याला खूपदा त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारले.. त्याक्षणी तो मला आता हारण्याची भीती वाटू लागलेय असं म्हणून बाजुला निघून जायचा. दारू-सिगारेटच्या व्यसनांनी त्याच्या शरिरावर पुर्णपणे कब्जा केला होता. रोहन आता ढासळत चालला होता. पण आजही त्याच शरिर सिक्स पॅकवाल्या मॉडेलपेक्षा काही कमी नव्हते. त्या शरिरानेच त्याच्या आयुष्यात एक असा यु टर्न आणला..,! कि त्याचं आयुष्यच पार बदलून गेले. त्या रात्री मिलन बारमध्ये रोहन एकटाच दारू पित बसला होता. त्याच्याकडे काही काम नव्हते पण पैसा पुरवणारी मीरा त्याच्या आयुष्यात होती. त्याच पैशांच्या जोरावर तो वेटरला धमकावून दारू आणून देण्याबाबत सांगत होता.

लग्न होऊन अवघे एक वर्षच झाले आणि राधिकेचा नवरा परदेशात एका विमानाच्या दुर्घटनेत तिला ऐन तारूण्यात सोडून निघून गेला. काही दिवस तिने नवरा सोडून गेल्याचं दुःख करत स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले. पण नंतर किर्तीच्या मदतीने तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. किर्ती राधिकाच्या शेजारीच राहायची. दोघीही जिवलग मैत्रीणीसारख्या रहायच्या आणि आश्चर्याची गोष्ट अशी कि दोघीही एकट्याच राहायच्या. किर्तीचे लग्न झाले आणि काही दिवसातच तिचा नवरा तिला मारझोड करू लागला. जसजशी रात्र व्हायची त्याच्या अंगात एखादं श्वापद शिरायचं आणि मग हातात येईल त्या वस्तूने तो किर्ती ला मारायचा. रोज रोजच्या मारझोडीला कंटाळून किर्ती ने तिच्या नवय्राला सोडून दिले. नवय्राला सोडल्यानंतर तिची आणि राधिकाची ओळख झाली. दोघींच्या विचारांमध्ये खूपसे साम्य असल्यामुळे दोघींची चांगलीच मैत्री जमली.

ज्या बारमध्ये रोहन दारू पित बसला होता. तिथेच दोन टेबल सोडून तिसय्रा टेबलवर राधिका व किर्ती कसलीशी पार्टी सेलिब्रेट करत होत्या. रोहनच्या प्रत्येक हालचालींकडे त्या बारकाईने लक्ष देत होत्या आणि एकमेकींना खाणाखुणा करत होत्या. रोहन त्यांना प्रथमदर्शनीच आवडला होता त्या दोघींनाही रोहनसोबत मैत्री करण्याची इच्छा झाली होती. पण रोहनने जर त्यांना भावच नाही दिला तर त्यांचा इगो दुखावला गेला असता. आणि त्या दोघींनाही तसं काही घडू द्यायचे नव्हते. म्हणून त्या अचूक वेळेची वाट पाहत होत्या…

डोळ्यासमोर पुर्णपणे अंधारी येतेय.. कुणीतर मला ओरबाडतय… कपडे फाडले जात आहेत… कुजबुजण्याचा हसण्याचा आवाज कानामध्ये घुमतोय… पण डोळे उघडण्याचा प्रयत्न असफल ठरतोय… हातांना कुणीतर घट्ट बांधलय… माझ्या शरिराचे लचके तोडले जातायेत… पुन्हा एकदा तोच आवाज घुमतोय…. विचित्र पुर्णपणे वेगळा…. “कम बेबी… कम… यु गोईंग ग्रेट….येस्स…. या… आय लाईक दिज….! कोण कुणाला MoTiVaTe करतय काहीच कळत नव्हत.. अंग थकत चाललय पुर्णपणे.. माझ्या प्रायव्हेट पार्टवरती कसलंस ओझं मला जाणवतय… पण मी हाताने दुरही करू शकत नाही.. मी नुसताच उताणा पडून… जे काही माझ्यासोबत घडत होतं… ते सहण्याचा प्रयत्न करत होतो.

गरम तप्त उन्हाचा स्पर्श कपाळाला झाला तशी जाग आली. डोळे चोळत उठण्याचा प्रयत्न करत असताना कंबरेला जोरात अशी सणक गेली. मी त्या स्थितीत पुर्णपणे निर्वस्त्र…. नक्की मी कुठे आहे माझे मलाच कळत नव्हते… रात्री नक्की काय घडले त्याचा मी विचार करत होतो. डोके खूप जड झाले होते.. कपाळाच्या नसा ठणका मारत होत्या.. मांडीच्या पोटय्रांना चमक जाणवत होती. छातीवर… मानेवर नखांनी कुणीतरी ओरबाडले होते. जागेवर उठून बसत घड्याळ बघितलं.. सकाळचे साडे अकरा वाजलेले… बेडजवळ पडलेल्या कपड्यातल्या ढिगामधून मी माझे कपडे शोधून घाई-गडबडीत कसेबसे अंगावर चढवून बाहेर आलो..

“हेय रोहन… गुडमॉर्निंग…. मागून आलेल्या आवाजाने मी तिथेच थबकलो. घाबरत घाबरत मागे वळून पाहिले.” कोण आपण.? आणि मी इथे कसा आलो.? कुणी आणल मला इथे..? ”
अरे होऽऽऽहो किती ते प्रश्न.?
घे कॉफी घे..
तिच्या हातातून कॉफीचा मग घेतला.. थँक्स.,

सो… रात्री तु ज्या बारमध्ये ड्रिंक करत होतास… तिथे काल आम्हीसुध्दा होतो…,!
“आम्ही म्हणजे अजून कोण होतं तुमच्यासोबत.?
“एकच मिनिटं… किर्ती.. अगं ये किर्ती… तुझा बॅट्समन बघ तुला बोलावतोय..
“हो गं झालीच माझी आंघोळ… आलेच मी..,
” हाय रोहन… मग कशी गेली कालची रात्र.? मज्जा आली कि नाही मग रात्री.?
“मज्जा..??? कसली मज्जा?
” अरे देवा…राधे…तुझ्या कृष्णाला तर त्याच्या रात्रीच्या रासलिला पण आठवेना… बिच्चारा..

काही वेळातच किर्तीने तिच्या फोनमध्ये एक विडिओ क्लिप लावून माझ्या हातात दिली.. मी त्या क्लिपमध्ये सेक्स करतोय… छेऽऽऽछे त्या दोन मुली माझ्याकडून करवून घेत होत्या. पण मग त्या दोन मुली कोण असाव्यात.? असा विचार करत मी वर पाहिलं आणि मग मला थोडं थोडं समजू लागलं.
“काय हा मुर्खपणा आहे.? कोण आहात तुम्ही..? आणि त्या दोघीपण तुम्हीच आहात ना??
” अरे वाह.. तु तो बडा ही समजदार है…- किर्ती
“तुम्ही असं का केलं माझ्यासोबत.?? मी काय वाकडं केलं होतं तुमच.?
“प्लीज… डिलीट दिज विडिओ क्लिप.. आय डोन्ट लाईक दिज टाईप ऑफ चिपनेस…
“विडीओ तर वायरल करण्यासाठी बनवला जातो.. तुझा वासना पिक्चर फ्लॉप गेला… पण हा सुपर डुपर हिट जाईल…” हो की नाही राधा?
करेक्ट-राधा
” नक्की काय हवय तुम्हाला.??
“पैसा तर मुळीच मागणार नाही आहोत आम्ही… कारण भिकार्‍यांकडे पैसे मागण्या इतके मुर्ख नाही आहोत आम्ही…
” मग काय हवय तुम्हाला.??
” तेच.. जे वासना चित्रपटात पैशांसाठी केलस… तेच तु आमच्यासाठी आमच्यासोबत करायचं… पैसे आम्ही देऊ तुला…
तुम्ही ब्लॅकमेल करत आहात मला.
“अजून खूप काही करतो आम्ही.. विडिओ निट नाही पाहिलास का??

“हि तुझी पहिली कमाई साठ हजार रूपये… यु आर द बेस्ट जिगोलो..,!
“नो आय अॅम नॉट अ जिगोलो..
आता तु तोसुद्धा झालायस…
मिट टुमारो 8 PM अॅट रेड लाईट एरिया….
आमच्या खूप साय्रा मैत्रिणींना तुझी ओळख करून द्यायचेय…!

जिगोलो… जिगोलो… मुंबईला काहीतरी चांगल काम करून नाव कमविण्यासाठी आलो होतो.. परिस्थितीने कॉल बॉय बनवलं… आता माझं सारकाही उध्वस्त झालं होतं… मागे आपलं असं कुणीसुध्दा उरलं नव्हतं.. मीरा एक अशी होती आपल्याला साथ देणारी पण आज तिच्याकडे कोणत्या तोंडाने मी जाणार होतो..??
“रिक्षाऽऽऽऽ भैया रेड लाईट एरिया चलोगे??

समाप्त

निल राठोड

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here