Premachi Gosht : प्रेमाची गोष्ट

2
2438

Premachi Gosht : प्रेमाची गोष्ट

सहज ….साधी….सोपी….

प्रेमाची गोष्ट.

Premachi-Goshta

प्रेमाची गोष्ट हा सतीश राजवाडे यांचा चित्रपट…. या चित्रपटाची प्रेक्षकांना जास्त उत्सुखता लागण्याचे कारण म्हणजे अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे या जोडीचा हा पहिलाच चित्रपट..

[tube]H2Qf3X8jqC8[/tube]

मराठीत तसे रोमॅंटिक चित्रपट फारच कमी.. पण मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाच्या यशानंतर सतीश राजवाडे पुन्हा एकदा एक वेगळाच रोमॅंटिक चित्रपट घेऊन पुन्हा एकदा रसिकांच्या समोर येत आहेत.

प्रेमाची गोष्ट या नावा वरूनच लक्ष्यात येते की ही एक लव स्टोरी आहे….

अतुल कुलकर्णी, हिन्दी आणि मराठी चित्रपटातून रसिकांचे मनोरंजन करणारा एक उत्कृष्ट अभिनेता… अतुल कुलकर्णी यांनी नटरंग या चित्रपटात जो अभिनय केला तो खरच ‘चाबूक’ होता..

यांनी अनेक हिन्दी चित्रपटांमध्ये सुध्धा महत्वाच्या भूमिका केल्या आहेत, जसे दम,रंग दे बसंती , चालीस चौरासी, दिल्ली ६….

पण प्रेमाची गोष्ट हा अतुल कुलकर्णी यांचा पहिलाच रोमॅंटिक चित्रपट…

सागरिका घाटगे, चक दे गर्ल म्हणून फेमस असलेली सागरिका प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून मराठी मध्ये पदार्पण करीत आहे.

चित्रपटात विशेष म्हणजे सतीश राजवाडे सुध्धा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत….

तर रोहिणी हट्टंगडी या तब्बल २२ वर्षांनंतर मराठी चित्रपटात दिसणार आहेत .

प्रेमाची गोष्ट ही दोन अनोळखी तरुणांची कथा आहे… त्यांच्या भेटी नंतर सहज साधी आणि सोपी अशी घडून येणारी ही प्रेमाची कथा… लग्न प्रेम या विषयी दोघांची वेगवेगळी मते..

प्रेक्षकांना अर्थातच सध्याच्या तरुणांना स्वतःची वाटणारी ही मते..

जसे.

[quote]देवाचा प्रत्यय तेव्हाच येतो जेव्हा तुमची त्यावर दाट श्रद्धा असते, लग्न संस्थेचही तसच असत..[/quote]

Premachi-Goshta-Marathi-movie

[quote]एकच काहीतरी निवडता येते, लग्न करा किंवा आनंदी रहा.[/quote]

Premachi-Gosht

[quote]नात संपलं तरी प्रेम उरतच[/quote]

Premachi-Goshta-Marathi movie

सतीश राजवाडे यांचा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट खूपच गाजला… या चित्रपटाचे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक करण्यात येत आहेत… तर स्वतः सतीश राजवाडे यांनी चित्रपटातील जोडी म्हणजेच स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या बरोबर केलेली ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका खूपच गाजली..

नुकताच या मालिकेचा सिनेमॅटोग्राफी भाग म्हणजेच तीन तासांचा भाग प्रदर्शित करण्यात आला…त्यालाही प्रेक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला…

सतीश राजवाडे यांचा प्रेमाची गोष्ट रसिकांवर किती प्रभाव पाडतो ते लवकरच कळेल..

प्रेमाची गोष्ट  चित्रपटाला मराठीबोली.इन कडून हार्दिक शुभेच्छा…

[tube]PWqjDGeCjTA[/tube]

प्रेमाची गोष्ट(Premachi gosht)

 

 

2 COMMENTS

  1. प्रेमाची गोष्ट…… प्रेमाचे रूपांतर लग्नात करण्याआधी कुठल्या गोष्टी तपासाव्या , लग्नानंतर जोडीदाराकडून काय आपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्यानाहित तर काय होत , जोडीदारांनी एकमेकांना वेळ देणे किती महत्वाचे असते अश्या असंख्य गोष्टी यात उत्तम प्रकारे मांडल्यात. शरीरा पलीकडे जाऊन मनातील भावना समजून केलेल प्रेमच खर टिकत हे छान पटून दिलंय……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here