Majhya Bhaujina Rit Kalena Marathi natak – माझ्या भाऊजींना रीत कळेना ..

0
1819

आज दसर्‍याच्या मुहूर्तावर…

प्रशांत दामले, कविता लाड आणि संतोष पवार यांचे नवीन नाटक माझ्या भाऊजींना रीत कळेना हे रंगमंचावर येत आहे.

प्रशांत दामले निर्मित आणि संतोष पवार लिखित माझ्या भाऊजींना रीत कळेना..

new Marathi natak Majhya Bhaujina Rit Kalena

या नाटकातून प्रशांत दामले आणि कविता लाड ही रसिकांच्या आवडीची जोडी तब्बल ९ वर्षानी रंगमंचावर येत आहे…

 

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन या जोडीने केले.

सुंदर मी होणार या नाटकातून रसिकांच्या भेटीस ही जोडी सर्व प्रथम आली.

या नंतर प्रशांत आणि कविता या जोडीची वाटचाल सुरू झाली…

चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट या नाटकांनी नाट्य रसिकांची मने जिंकली..

प्रशांत दामले आणि संतोष पवार हे या नाटकातून प्रथमच एकत्र काम करत आहेत…

 

नाटकाच्या नावावरूनच हे लक्ष्यात येते की हे एक विनोदी नाटक आहे.

या नाटकात भाऊजींची भूमिका प्रशांत दामले यांनी केलेली आहे.

तर संतोष पवार आणि कविता लाड हे नवरा बायकोच्या भूमिकेत आहेत.

भाऊजींचा आगाऊ किंवा खोडकरपणा रसिकांना किती आवडतो हे लवकरच कळेल..

[tube]aVL-eT6O7tI[/tube]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here