गत आठवणी – Marathi Kavita Gat Athavani

0
1280

Marathi-kavita-gat-athavani

गत आठवणी – Marathi Kavita Gat Athavani

सोडूनी मज गेलीस तू आता मी कसे जगावे
वाटते तव आठवणीत जीवन हे संपवावे ।

एक एक क्षण प्रेमाचा का आठवणीत रहावा
ह्रदयातील त्या आठवणींना अश्रुंत संपवावे ।

ठेवले जपून ह्रदयात मी त्या मधूर क्षणांना
का त्या मधूर क्षणांना पुन्हा मी आठवावे ।

आसमंत चांदण्यांनी झगमगून गेलाय येथे
एका चांदणीसाठी मग मी का रुसून बसावे ।

कैफात नशेच्या विसरतात वेदना दुःख कोणी
माझ्याच वेदनेला मी कवटाळूनी का रहावे ।

 

सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here