Marathiboli Competition 2016 – Marathi Kavita – इथे-तिथे

0
1140

Marathiboli Competition 2016 – Marathi Kavita – इथे-तिथे

Marathi-Kavita

इथे देह लपेटला पांढऱ्या वस्त्रात माझा
तिथे देह तिने कुणास लपेटला होता

इथे अबब गर्दी यात्रेस माझ्या
तिथे सबब शहारण्या दर्दी कुणी होता

इथे फुले पांघरुनी मी सजलो अखेरचा
तिथे फुले अंथरुनी कुणी नभात होता

इथे चारचौघे सरसावले मज उचलण्या
तिथे एकट्याने चंद्र झेलला होता

इथे मिरवणूक माझी दारी स्मशानाच्या
तिथे स्वर्गाचे कुणी दार ढकलीत होता

इथे मला पसरले सरणावरी लाकडाच्या
तिथे दुलईत तिला स्पर्श घेरला होता

इथे श्वास कुठला? मातीचा देह निजला
तिथे वेग श्वासांचा कसा वाढला होता

इथे लोक पाहती घड्याळे हे उरकण्या
तिथे सुखावण्या, काळ थांबला होता

इथे जाळ झाला, अन् देह राख झाला
तिथे पेटणारा.. ..पेटून शांत होता.. ..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here