खबरदारी – Marathi Kavita Khabardari

0
1187

Marathi-Kavita-Khabardari

लेखक – विजयकुमार देशपांडे
संपर्क –

खबरदारी – Marathi Kavita Khabardari

क्षुल्लक कारणावरून
तुला असे
मुळूमुळू
रडतांना पाहून,

मी थोडातरी
विरघळेन,
असे वाटले असेल तुला –

माझ्या
य:कश्चित जिवासाठी
तू
अनमोल अश्रू ढाळतेस…

माझ्या रुक्ष चेहऱ्यावर
तू जाऊ नकोस –

माझ्या
कठोर काळजातही
तुझ्या
आसवांचे मोती
जपून साठवताना –

माझी
किती तारांबळ
जिवाची घालमेल होतेय …

तुला
तीच न दिसण्याची
खबरदारी घेत आहे मी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here