भ्रमनिरास – Marathi Katha Bhramaniras

0
1404

Marathi-Katha-Bhramniras

लेखक – विक्रम बल्लाळ
संपर्क – vikramsinhballal828@gmail.com

भ्रमनिरास – Marathi Katha Bhramaniras

वडाच्या झाडा खालन परत प्रकाश नं माग पाहिलं,झाडाच्या पारंब्या लोम्बकळत व्हत्या…स्मिता माग बघल ह्या खोट्या आशेपायी त्याची नजर एकटक तिच्याकडं पाहत व्हती पण तीन माग वळून नाय पाहिलं,प्रकाश मात्र तिथंच होता,तसाच आज झालेला प्रकार त्याच्या डोळ्याम्होर तरळू लागला  किती सहज ती म्हणाली व्हती आपुनि वेगळं होऊया”,कारण फक्त एकच व्हतं प्रकाश ला नोकरी नव्हती अजून त्यो अभ्यासच करत व्हता,mpsc चा.
आज प्रकाश न वयाची 29 वी घाटली व्हती,गेली 5-6 वर्ष झालं अभ्यास चालू व्हता पण नोकरी काय मिळत नव्हती,ही  ऍड निघाली की पोस्ट मिळल ती ऍड निघाली मिळलं असं म्हणता अत्ता प्रकाश पुरता खचला व्हता,घरून लग्नासाठी अन कामासाठी सारखी विचारणा होतं व्हती, स्मिताच लग्न ठरवणं पण चालू व्हतं ,त्यातन कसाबसा अभ्यास उरकून प्रकाश आपलं दिस पुढं ढकलत व्हता पण आज त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला व्हता जिच्यावर त्यो जीवापाड प्रेम करत व्हता तीला पण त्यो नाही तर त्याची नोकरीच प्यारी व्हती,नोकरी नाय मिळत म्हणलं की ती पण प्रकाशला सोडून गेली व्हती.
त्याची नजर एकटक तिच्याकडं  बघत व्हती,शेवटी ती दिसेनाशी झाली कदाचीत कायमची?त्यानं आपला डावा हात वडाच्या पारंब्या कड आपल्या डोक्याकड घेतला,अन आपली नजर वडाच्या बुद्यांशी वळवली…. स्मितांन कोरलेलं प्रकाश लव्ह स्मिता आज त्याला अंधुक दिसत व्हतं सर्व वायदे,विश्वास,प्रेमाच्या बाता खोटा व्हत्या शेवटी पैश्या पुढं प्रेम फिक्क पडलं व्हतं….!
घरात पण पैशाची लय तानातान व्हतं व्हती,प्रकाशाचा बाप तसा खजगी नोकरीला,आत्ता व्हतं नव्हत पण पोरगा नोकरीत लागल्यावर काम बंद करावं…राहिलंय त्ये आयुष्य निवांत काढावं असा विचार त्यो करत व्हता,पोरासाठण लय केलं व्हतं त्यानं,पोरग काय वाईट नव्हतं पहिल्यापासन शाळेत लय हुशार कला शाखेतंन 15 वी केली,पुढं एम. ए अन काय काम न्हाय म्हणून बी. एड पण…2 -३वर्षे खाजगी शिक्षक  पण झाला, त्यासाठण बापन लय कस्ता खाल्या,तवा बापाला पोरावर गर्व व्हता पण अता बापालाच त्याची काळजी लागली व्हती,नोकरीच जाऊद्या कुणी लग्नाला पोरगी पण देत न्हाय आजकाल हे त्याला माहित व्हतं…कैक पोरीच्या बापन तर आधीच सांगून टाकलं व्हतं,”नोकरी,न्हाय,शेती न्हाय नुसतं शिकून काय उपयोग आजकाल शिक्षणापरीस पैसा पाहिजी….!”त्यात प्रकाशच वय पण वाढल व्हतं,त्याच्या वयाच्या कैक पोरांच्या अंगा खांद्यावर पोरं खेळत व्हती,त्याच्या गावची  न शिकलेली पोरं तर पडलं त्ये काम करून खूष व्हती….
आता  प्रकाश वैफल्यग्रस्त जगत व्हता,समाजच वास्तव विस्तवागत ढसत होतं त्याला,जगन असह्य झालं व्हतं स्मिता लग्न करून तिच्या नवऱ्यासोबत राहत व्हती,
प्रेमावरन तर विश्वास उडला व्हता त्याचा,अभ्यासात लक्ष्य लागतं नव्हतं,कधी कधी मनात विचार येत व्हता सोडून द्यावी सगळी स्वप्न अन कुठंतरी साधी नोकरी बघावी,बापानं तर आधीच सांगितलं व्हतं,अत्ता बस झालं कुठंतरी काम बघा…कधी घरात किर किर पण होत व्हती,प्रकाशच सगळं विस्कटल व्हतं,शिकून मोठं व्हन सोडाच,नुसता नि नुसता अधांर दिसत व्हता त्याला त्यातून वाट काढणं लय अवघड झालं व्हतं,वेळ पण गेली व्हती आज त्याला कुणाच्या तरी साथीची गरज व्हती,जीन दयायला हवी व्हती ती मधीच त्याची साथ सोडून गेली व्हती,तिची तरी काय चूक व्हती तिला नोकरिवाला नवरा पाहिजे व्हता….!
प्रकाश मात्र आजही तिच्याच आठवणीत होता नशिबाला दोष देत दुखी आयुष्य जगत व्हता….त्याचा भ्रमनिरास झाला व्हता….
प्रकाश वडाच्या झाडाखाली आज बऱ्याच दिवसांनी आला,वडाच्या पारंब्याला हात देऊन तो स्वताशीच बोलू लागला.
“कायच नीट नाय झालं,सारच विस्कटल”
झाडावर कोरलेलं प्रकाश स्मिता तो दगडान खोडू लागला ,खोडताना त्याच्या डोळ्यात पाणी व्हतं, मन दुखान भरून आलं व्हतं,त्याला लय बोलायचं व्हतं,मन मोकळं करायचं व्हतं पण त्यो काय बोलणार मग मनाशीच तो म्हणाला
“माझ्यासारखी किती पडल्यात हीत, हे तुला पण माहीत व्हतं स्मिता…..!
3 वर्षे शिक्षकी नोकरीत गेली माझी….पण तीथ 15 लाख मागितलं… तेवढा न्हाय ना मोठा माझा बाप,मग म्हणलं बिना पैशे भरता मोठ्या पोस्ट ची नोकरी पाहिजी असलं तर mpsc…..,ते पण न्हाय शक्य झालं माझ्या सारखे कीती जण हायत ज्यांना नाय निघत पोस्ट त्यांना नाय नोकरी ,शिकून मेल्यागत झाल्यात….!”
आज प्रकाश मनाशीच खूप दिवसांनी बोलला व्हता,वडाच्या पारंब्या वाऱ्याच्या झुळु कींन हालत व्हत्या….वारा सुटला व्हता,प्रकाशाच्या मनाचा बांध फुटला आन त्यो लहान पोरागत रडू लागला…..!

झाडाखालन घराकडं जाताना त्याच्या तोंडात एक वाक्य व्हतं

“माणसापरीस पैशाला लय किंमत हाय,पैश्या पुढं माणसाच्या भावनांची कदर नाय केली जात……..!”
प्रकाश एक वेगळी उमेद घेऊन निघाला व्हता…….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here