Marathi Kavita – होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं
स्वर्गाहून सुंदर अशा जगात मला रमायचं…
होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं…
निसर्गाच्या सौंदर्याला मला आता अनुभवायचाय…
तुज्या निरागस डोळ्यात पुन्हा एकदा हरून जायचं…
होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं…
धाकाधखीच्या या जगात थोडा स्थिर मला व्हायचं…
स्वतासाठी नाही तर किमान तुझासाठी तर जगायचं…
मनामधील दुखाला आता वाट मोकळी करून द्यायचय…
साठून ठेवलेल्या विचाराना आता तुज्या समोर आणायचं…
होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं…
संकुचित जीवन शैलीला थोड प्रेमाने पाहाचय…
प्रेम दिल्याने प्रेम वाढतं हे आता मला अनुभवाचय…
कल्पना शक्तीच्या पलीकडच जग मला पाहाचय…
होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं…
होय मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं…