Marathi Movie Dam Asel Tar : दम असेल तर….

0
1112

Marathi Movie Dam Asel Tar : दम असेल तर

सागर सकुंडे फिल्म्स निर्मित आणि विजय गोखले दिग्दर्शित दम असेल तर हा मराठी चित्रपट 28 सप्टेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे.

marathi movie dam asel tar

व्हीसलिंग वुड्स या अद्ययावत प्रशिक्षण घेतलेला शंकर या चित्रपटातून मराठी चित्रपटा मध्ये प्रवेश करत आहे.. शंकर बरोबर या चित्रपटामध्ये मनवा नाईक, स्मिता शेवाळे, उदय टीकेकर, मोहन जोशी, शुभांगी लाटकर, विघ्नेश जोशी, विजय गोखले अशी दमदार स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे..

शंकर या चित्रपटामध्ये अन्याया विरुद्ध लढणार्‍या एका तरुणाचा अभिनय करत आहे.

[tube]afBgqwkuRLY[/tube]

[tube]5VG7grlkUiw[/tube]

[tube]t9vl0EPM5cs[/tube]

वर्षानुवर्षे सत्तेत राहून गब्बर झालेल्या आणि जनहितच्या कामापेक्षा भ्रष्टाचारात स्वारस्य असणार्‍या प्रस्थापित नेत्यां विरोधात चित्रपटाचा नायक शंकर बंड पुकारतो.

चित्रपटामध्ये शंकरला मिळणारी तरुणाईची साथ, विरोधकांनी निर्माण केलेल्या अडचणी, त्यावर शंकरने केलेली मात असा संघर्ष अनुभवायला मिळणार आहे..

थोडक्यात सांगायचे तर, सोशल नेटवर्किंग साइटवर किंवा काही आंदोलनांमध्ये तरुणाईचा जो वाढता प्रभाव आहे, जी तरुणांची मते आहेत..ती आपल्याला या चित्रपटात पहायला मिळतील..

तर शंकरचा हा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा पहाण्यासाठी नक्कीच जा…

२८ सप्टेंबर २०१२… राज्यभर प्रदर्शित होणार…. दम असेल तर ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here