धरतीची लेकरं – Marathi Kavita Dhartichi Lekar
धरतीची लेकरं ,
अंगात लक्तरं ,
शेतात राबती,
नेसून पटकुरं !
धरतीची लेकरं ,
खाती मीठ भाकर,
सर्वांना मानती,
जिवाचे मैतर !
धरतीची लेकरं ,
कर्जानं जर्जर,
कवडीकवडी फेडण्या,
होती अस्थिपंजर !
धरतीची लेकरं,
पती आई पांढर,
दिनरात लंघती
दु:खाचा डोंगर !
कवी : विष्णू शिंदे, पुणे
संपर्क : shindevishnu1940@gmail.com