The Alchemist (मराठी अनुवाद) – Book Review by Pranav Unhale

2
135
alchemist book review
प्रणव जयंत उन्हाळे
संपर्क : 9158960100
संभाजीनगर

विश्वविख्यात लेखक ‘पाउलो कोएलो’द्वारा मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिलेली ही जगप्रसिद्ध कादंबरी !

तब्बल ८३ भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या कादंबरीने, लेखक पाउलो कोएलो यांना, ‘Most Translated Author’ हा खिताब मिळवून दिला ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन वेळा झाली !

पूर्वीच्या काळी, विविध प्रक्रियांद्वारे सामान्य धातूंचे रूपांतर सोने या धातुमध्ये करण्याची ‘Alchemy’ नामक गूढविद्या अस्तित्वात होती. ही विद्या ज्या व्यक्तीस अवगत असे त्यास ‘Alchemist’ म्हणून संबोधले जाई; थोडक्यात, ‘अल्केमिस्ट’ म्हणजे रसायनशास्त्राचा जाणकार !

या कादंबरीतील संदर्भाशी संबंधित संज्ञा सांगायची झाल्यास, ‘अल्केमिस्ट’ म्हणजे निसर्ग आणि विश्व यांची परिभाषा समजणारा आणि त्यांच्याकडून येणाऱ्या संकेतांना ओळखणारा बुद्धिमान ज्ञाता !

‘द अल्केमिस्ट’ ही साहसकथा आहे, ‘स्पेन’ देशामधील ‘अंदालुसिया’ नामक पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या ‘सॅन्तियागो’ नावाच्या एका मेंढपाळ तरुणाची !

Buy Marathi Book The Alchemist Online from MarathiBoli.com

कथानकाचा नायक, सँतियागोला वाचनाची आवड होती. एकदा गाढ झोपेत असतांना, त्याने एक स्वप्न पाहिले. स्वप्नामध्ये एक लहानशी मुलगी सॅन्तियागोला ईजिप्तच्या पिरॅमिडमध्ये घेऊन गेली आणि तिथे एक गुप्त खजिना दडलेला असल्याचे तिने सँतियागोला सांगितले. हेच स्वप्न सॅन्तियागोने दोन वेळा पाहिले. त्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी अंदालुसिया पासून इजिप्त देशापर्यंतचा अतिशय संघर्षमय प्रवास त्याने केला. प्रवासादरम्यान त्याला अनेक लोक भेटले, त्यांच्याकडून अनेक गोष्टी तो शिकत गेला, वेगवेगळे अनुभव त्याला आले; त्याप्रमाणे स्वतःमध्ये आवश्यक त्या सुधारणा त्याने केल्या, आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे अव्यक्त संकेत ओळखण्यास तो शिकला आणि अखेरीस या सर्वांचे फळ म्हणून त्याला जे मिळाले त्यातून जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले अनेकानेक बोध सांगणारी ही प्रेरणादायी कथा, ‘द अल्केमिस्ट !’

आजच्या काळात संघर्षमय जीवन जगत असतांना, आपले लक्ष्य गाठण्याची प्रेरणा देणारी शक्ती अंतर्भूत असलेली ही दास्तान आहे !

आपल्यापैकी प्रत्येकालाच जीवनाच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वी, संघर्ष, अपयश, अपघात, विश्वासघात, मानहानी, आप्तस्वकियांचा विरह, निसर्ग आणि मानव निर्मित संकटे; इत्यादी वेदनादायी प्रसंगांमधून जाणे क्रमप्राप्त असते, या प्रसंगांमधून जातांना, आपल्याला कमालीच्या संयमाने आपले अस्तित्व आणि स्वत्व जपावे लागते आणि अखेरीस फलरुपी जे आपल्याला प्राप्त होते त्याची साक्ष देणारा हा लेखाजोखा आहे ! ‘Respect the Process’ ही या कथेची मूळ शिकवण आहे !

• अल्केमिस्ट आपल्याला शिकवतो त्या जीवन सुधारक शिकवणी – Life Lessons from ‘The Alchemist’ :-

• What is ‘true’ will always endure !

– सत्य सदैव शाश्वत असते.

• आपण कुठून आलो आहोत आणि आपला भूतकाळ काय ? हे आपण कधीही विसरता कामा नये !

• आपण बदलाची अपेक्षा नेहमी इतरांकडून ठेवतो, स्वतःकडून नाही !

• काही लोक त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पैसा आणि अन्न-पाण्यासाठी जगतात, त्यांना स्वप्नं, महत्वाकांक्षा असे काहीच नसते; आपण अश्या लोकांपैकी एक होता कामा नये !

• कोणतंही स्वप्नं सत्यात उतरवायचं असेल, तर आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते.

• पैसा आणि संपत्ती नसण्यापेक्षा आत्मविश्वास नसणे ही गोष्ट आपल्याला दरिद्री बनवते.

• कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि त्यात नैपुण्य मिळवण्यासाठी फक्त एक मार्ग असतो, कृती !

• आपण कधीही आपल्या समस्यांवर रडता कामा नये ! आपल्याला मिळालेला मनुष्य योनीतील जन्म हीच देवाने आपल्याला दिलेली सर्वश्रेष्ठ भेट आहे आणि ज्याप्रमाणे पक्ष्यांना हवेत उडण्यासाठी देवाने पंख दिले आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्यासाठी देवाने आपल्याला तेवढे सक्षम बनवले आहे !

• जेव्हा आपण स्वतःला अधिकाधिक सक्षम, सहनशील आणि उत्तम बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक परिस्थिती ही चांगली आणि आपल्या सोयीची होत जाते !”

• जेव्हा देव आपल्याला ध्येयाकडे नेणारा मार्ग दाखवत असतो तेव्हा तो त्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणींविषयी कधीच सांगत नाही !

• आपली स्वप्नं पूर्ण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीमध्ये इतर कोणत्याही गुणांपेक्षा एक गुण असणं सर्वात जास्त महत्वाचं असतं, सहनशीलता !

• आपल्या ध्येयाचा पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने, आयुष्यात कितीही दुःखद घटना घडली तरी सतत पुढे जात राहण्याची आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहण्याची क्रिया कधीही थांबवता कामा नये !

• ध्येयाचा पाठलाग करतांना आपल्या चिकाटीची, निष्ठेची, धैर्याची आणि संयमाची अग्निपरीक्षा घेतली जाते !

• स्वतःचं भविष्य साकार करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या व्यक्तीने आपण मागे काय सोडलं ? किंवा आपल्याला मागे सोडून कोण पुढे निघून गेलं ? याचा विचार कधीही करू नये !

• आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती कधीही आपलं भवितव्य साकार करण्यापासून आपल्याला रोखून धरत नाही. जर कोणी आपल्याला ध्येय साकार करण्यापासून रोखत असेल तर, त्याला प्रेम म्हणता येणार नाही !

• कोणत्याही व्यक्तीकडून आपली फसवणूक झाल्यास, स्वतःला फसवणुकीस बळी पडलेला माणूस म्हणून पहायचं की आपल्या ध्येयाकडे कूच करणारा साहसी वीर म्हणून पहायचं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं.

फसवणूक केव्हा न केव्हा प्रत्येकाचीच होत असते, आपण त्याविषयी काय विचार करतो यावर आपलं भवितव्य अवलंबून असतं!

• “वर्तमान कसाही असो, आपण त्याचा स्वीकार करायला हवा !”

– अल्केमिस्ट म्हणतो, “मी माझ्या भूतकाळात अथवा भविष्यात कधीही जगत नाही. मला फक्त वर्तमानात रस आहे. जर तू नेहमी वर्तमानावर लक्ष केंद्रित करू शकलास तर तू नेहमी आनंदीच राहशील !”

भूतकाळाविषयी पश्र्चाताप अथवा दुःख व्यक्त करत राहणे, त्यातच हरवून जाणे आणि भविष्याबद्दल चिंता करणे यात काहीही अर्थ नसतो. सध्याच्या क्षणी, आपण शक्यतेच्या क्षेत्रात आहोत – आणि या क्षणात आपण स्वतःला कश्या प्रकारे गुंतवून घेतो यातूनच भविष्यातील आपले जीवन कसे असेल हे निर्देशित होते.

• आपल्या सभोवताल असलेल्या सर्वच परिस्थितींचा आपण वास्तव अथवा अंतिम सत्य म्हणून स्वीकार करता कामा नये !

Buy Marathi Book The Alchemist Online from MarathiBoli.com

(Be unrealistic)

– अल्केमिस्ट म्हणतो, मी जगाकडे त्या दृष्टीकोनातून पाहतो, जसे ते असायला हवे; असे मला वाटते. ते जसे आहे त्या दृष्टीकोनातून मी नेहमीच पाहत नाही.

जर १% लोकांनी जगाचा आणि परिस्थितीचा आहे तसा स्वीकार केला असता तर आजवर लागलेले महान शोध कधी सत्यात आलेच नसते. – Great achievements & innovations always begin with a mindset that ignores the impossible !

• Keep getting back up

– “The secret of life, though, is to fall seven times and to get up at 8th time !”

कारण कोणती Attempt आपल्याला पुढे नेणारी ठरू शकते हे आपल्याला माहिती नसतं. इतिहासातील कित्येक महान कादंबऱ्या अश्या आहेत ज्या प्रकाशित होण्यापूर्वी शंभरपेक्षा जास्त वेळा नाकारल्या गेल्या होत्या ! सुदैवाने, त्या कादंबऱ्यांच्या लेखकांनी कधीही हार मानली नाही.

• “गोंधळात न पडता अचूक निर्णय घेण्याची कला आपल्याला अवगत असायला हवी !”

– “जेव्हा आपण निर्णय घेतो आणि त्यानुसार कृती करतो, तेव्हा आपण स्वतःला नियतीच्या जोरदार प्रवाहात झोकून देतो, तो प्रवाह आपल्याला Comfort zone नावाच्या कुंपणाबाहेर घेऊन जातो जिथे परिस्थिती स्थिर न राहता शक्यतांचे दरवाजे उघडले जातात; आणि तो प्रवाह आपल्याला अश्या ठिकाणी घेऊन जातो ज्याची कल्पना आपण स्वप्नातही करू शकत नाही.”

• Never give up !

– Every search starts with beginners luck & ends with victor being severally tested!

• The Real Treasure Is Who We Become By Journey towards our Destiny.

– आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना, विविध गोष्टी शिकत आपण पुढे जातो, त्यामुळे जी प्रगल्भता आपल्या अंगी येते तीच आपली खरी संपत्ती आणि खरा खजिना असतो.

• Fear is a biggest obstacle than the obstacle itself.

– “Tell your heart that the fear of suffering is worse than the suffering itself; & No heart has ever suffered when it goes in search of its dreams, because every second of the search is a encounter with God & eternity.”

Every new pursuit requires entering in uncharted territory — that’s scary. But with any great risk comes great reward ! The experiences you gain in pursuing your dream will make it all worthwhile.

• Break the monotony.

– “When each day is the same as the next, it’s because you fail to identify the good things that happening in your life every day.”

Gratitude is the practice of finding the good in each day. Life can easily become motionless, boring & uninteresting but that changes depending on what we choose to see. There’s always a silver line if you look for it.

• Focus on your own journey

“If someone isn’t what others want them to be, the others become angry. Everyone seems to have a clear idea of how other people should lead their lives, but none about his or her own.”

It’s easy to be influenced by others, but you’ll be miserable if you end up living someone else’s life. There’s nothing wrong with taking advice and learning from others, but make sure it aligns with your desires and passions.

• We have to transform ourselves from base metal into Gold. That’s what the real Alchemy is all about.

• Respect the process you are going through!

– Alchemy is the process of changing Base metal into gold by heating & purifying it for years; Similarly, The tough times you are going through today, will make you the man of value tomorrow ! You’ll just have to Keep going & improving yourself by the lessons you learn during the journey !

•_•_• मनसुबा •_•_•

The Alchemist या मूळ पोर्तुगीज भाषेतील कादंबरीच्या हिंदी व इंग्रजीमधील प्रत्येकी एक आणि मराठीमधील दोन अनुवादांचा १५० पेक्षाही जास्त दिवस समग्र अभ्यास करून ही समिक्षा आपल्या समक्ष मी सादर करत आहे. असे असले तरी, या पुस्तकातील शिकवणींविषयी लिहितांना काही गोष्टी माझ्याकडून सुटल्या असल्याची शंका मनाला सतत सतावत आहे; मात्र किमयागार आपल्याला किती गोष्टी शिकवतो यापेक्षा आपण त्यातून नेमकं काय आणि किती आत्मसात केलं याला जास्त महत्त्व आहे, नाही का ?

उष्णता आणि शुद्धीकरण या प्रक्रियांद्वारे सामान्य धातूचे रूपांतर सोने या धातूमध्ये करण्याची विद्या Alchemy शास्त्रात सांगितली आहे. त्याप्रमाणेच आपण जीवनातील सर्व सुखद, दुःखद घटनांचे अर्थ आणि कारण समजून त्यात दडलेले संकेत ओळखायला हवेत, आपल्याला ‘सर्वसाधारण’ अशी ओळख देणारा नकोसा भाग दूर करून आपल्या अस्तित्वाला आकार देत निश्चित ध्येय साकार करावे; ही प्रमुख शिकवण मी या पुस्तकातून आत्मसात केली !

हे पुस्तक अभ्यासल्यानंतर, माझ्या जीवनात झालेला विशेष बदल असा की, दररोज मंदिरात गेल्यावर देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा मी हात जोडतो, तेव्हा त्या प्रार्थनेत आता भौतिक जीवनातील उपयोगी चीजवस्तूंची मागणी असत नाही ! क्षणिक सुखे भोगण्याची याचना असत नाही ! कोणी मला चांगलं म्हणावं, किंवा कोणी मला आपला म्हणून जवळ करावं असा आग्रह असत नाही ! असते ती फक्त कृतज्ञता ! त्या कृतज्ञतेत, माझा ‘आज’ हा माझ्या ‘काल’पेक्षा अधिक चांगला आहे ही जाणीव आणि आयुष्यात घडणाऱ्या घटनांमधील संकेत ओळखता येत असल्याचे आभार असतात !

हे पुस्तक आपल्याला भरभरून ज्ञान देईल, या सदिच्छेसह माझ्या वाढदिवसानिमित्त ही समिक्षा आपणास सस्नेह भेट !

आपलाच,

प्रणव जयंत उन्हाळे

द अल्केमिस्ट

मूळ लेखक – पाउलो कोएलो

अनुवाद :- Shuchita Nandapurkar Phadke

मंजुळ प्रकाशन

१९९ ₹

Buy Marathi Book The Alchemist Online from MarathiBoli.com

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here