Marathi Poems – दिवस थंडीचे
रात्र गार, गार गार पहाट
लादी गार, गार गार गादी
हवा गार, गार गार पाणी
फाटलेले ओठ, काटा अंगावरी
जुगलबंदी दातांची आगळी
पेटलेला बंब, भासे देवादुतावानी
कुडकुडणाऱ्या जीवाला, गरम चहाच तारी
गुलाबी हि थंडी, काट्यासारखी बोचरी
सूर्य देवा, अग्नि देवा, करा काहीतरी
Auto Amazon Links: No products found.









