MarathiBoli Writing Competition 2021 – मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.

0
1614

मराठीबोली कथा/कविता लेखन स्पर्धा २०२१.

MarathiBoli Writing Competition 2021

नमस्कार
मागील वर्षाच्या विश्रांती नंतर मराठीबोली पुन्हा या वर्षी दिवाळी स्पर्धा आयोजित करत आहे.

स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे.

कथा स्पर्धा
१. कमीत कमी १००० शब्दांची असावी.
२. विषयाचे कोणतेही बंधन नाही.
३. शुद्धलेखनाच्या किंवा टायपिंग चुका नसाव्यात
४. कथा या आधी कुठेही प्रकाशित नसावी .

कविता
१. कमीत कमी ३ कडवी असावीत.
२. विषयाचे कोणतेही बंधन नाही.
३. शुद्धलेखनाच्या किंवा टायपिंग चुका नसाव्यात
४. कविता या आधी कुठेही प्रकाशित नसावी .

स्पर्धेचा निकाल

स्पर्धेसाठी पात्र कथा/कविता मराठीबोली.इन वर आपल्या नावासह प्रकाशित होतील. प्रकाशित झाल्यावर पहिल्या ७ दिवसात संकेतस्थळावर मिळणाऱ्या अभिप्रायानुसार गुण दिले जातील. हे गुण सातव्या दिवशी त्याच कथेच्या/कवितेच्या शेवटी प्रकाशित होतील.
१. ७ दिवसात मिळालेले एकूण व्हिव्ज X २ गुण
२. सोशल नेटवर्क वरील लाईक X २ गुण
३. वाचकांच्या प्रतिक्रिया/कंमेंट्स X ५ गुण

या वरून ५०% गुण दिले जातील तर ५०% गुण हे मान्यवर परीक्षकांकडून दिले जातील.
कथा/ कविता पाठवण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२१.
कथा/कविता वर्ड फॉरमॅट मध्ये पाठवावी किंवा मराठीबोली.इन वर लिहावी. PDF स्वीकारली जाणार नाही.

निवडलेल्या कथा मराठीबोली E-दिवाळी अंकात प्रकाशित केल्या जातील.

बक्षिसे.
कथा स्पर्धा.
१. १५०० (५०० * ३) रुपये किमतीची कुपन, ज्याद्वारे आपण आपल्या आवडीची पुस्तके विकत घेऊ शकता.
२. १००० (५०० * २) रुपये किमतीची कुपन,
३. ५०० (३००, २००)रुपये किमतीची कुपन.
दिवाळी अंकात प्रकशित प्रत्येक कथेला १०० रुपयांचे कुपन.

कविता स्पर्धा

१. १००० (५०० * २) रुपये किमतीची कुपन, ज्याद्वारे आपण आपल्या आवडीची पुस्तके विकत घेऊ शकता.
२. ५०० (३००, २००) रुपये किमतीची कुपन,
३. ३०० (२००, १००)रुपये किमतीची कुपन.
दिवाळी अंकात प्रकशित प्रत्येक कवितेला ५० रुपयांचे कुपन.

याच सोबत चित्रपट, वेब मालिका , अभिनेते , अभिनेत्री यांच्या विषयी म्हणजे एकूणच मनोरंजन क्षेत्राविषयी ज्यांना लिहण्याची आवड आहे. ते सुद्धा लेख पाठवू शकतात, हे लेख आमच्या नवीन संकेतस्थळावर(haltichitre.com) प्रकाशित होतील. ( प्रत्येक प्रकाशित लेखाला २५-१०० रुपये मानधन मिळेल )

  • एका पेक्षा अधिक कथा किंवा कविता पाठवू शकता.
  • कुपन वापरताना कोणतीही कमीत कमी किंमत असणार नाही, फक्त एकूण रक्कम कुपन रक्कमेपेक्षा जास्त असावी.
    म्हणजेच ५०० रुपयाचे कुपन आपण ५०१ रुपयाच्या खरेदीसाठी वापरू शकता. आपल्याला ५०१ रुपयांची पुस्तके फक्त १ रुपया भरून मिळतील.
  • एका ऑर्डरसाठी एकच कुपन वापरता येईल.
  • स्पर्धेचा निकाल दिल्यानंतर ४८ तासात कुपन ई-मेल वर पाठवण्यात येतील. कुपन ४५ दिवसांसाठी वैध असतील.

काही अपरिहार्य कारणांमुळे जर कुपन उपलब्ध करता आले नाहीत तर संपूर्ण बक्षिसाची रक्कम गुगल पे, ऍमेझॉन कुपन अश्या पद्धतीने देण्यात येईल.
कथा/ कविता / लेख पाठवण्यासाठी इमेल – social@marathiboli.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here