इमारतीतून आरपार नेला उड्डाणपूल!

0
806

०४ ऑक्ट . लोकमत मधून …

कोणताही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला तर, त्याला विविध कारणास्तव खो बसतो वा घातला जातो, ही स्थिती आहे भारतातील. न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांमुळे अनेक सार्वजनिक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याचेही आपल्या देशात दिसते. पण इमारतीतून आरपार उड्डाणपूल नेऊन, मनात आणले तर, कोणत्याही अडचणीवर मात केली जाऊ शकते हे जपानने पुन्हा दाखवून दिले आहे.

flyover through building
भारतामध्ये ग्रामीण भागात एखादा प्रकल्प उभारायचे ठरवले तर, भूसंपादन प्रक्रियेपासूनच अडथळ्य़ांना सुरुवात होते. मात्र गेल्या शतकातील हिरोशिमा आणि नागासाकीसारख्या नृसंहाराच्या घटना तर, अलीकडेच त्सुनामीसारखी नैसर्गिक आपत्ती पचवून जपानने ‘पराभूत व्हायचे नाही’, हे ब्रीद कायम ठेवले आहे. ओसाकातील १६ मजली ‘गेट टॉवर बिल्डिंग’ नियोजित उड्डाणपुलाच्या आड येत होती. स्थानिक प्रशासनाने ती पाडण्याची नोटीस दिली. इमारत पाडण्यास न्यायालयानेही मनाई केल्याने ती आहे त्याच जागी उभी ठेवून उड्डाणपूल उभा करायचा होता. काही तरी जगावेगळे करणे हा तर जपानी स्थायीभाव. त्यामुळे संबंधित इंजिनिअर्सनी नामी शक्कल लढविली व इमारतीला वळसा न घालता इमारतीतूनच उड्डाणपूल व त्यावरील महामार्ग बांधला.

या इमारतीच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यांमधून हा पूल गेला असून ‘हायवे’ हा या मजल्यांचा भाडेकरू आहे. या इमारतीतील लिफ्टही चौथ्या मजल्यावरून थेट आठव्या मजल्यावरच थांबते. विशेष म्हणजे हा एक विशिष्ट अंतर राखून रस्ता नेण्यात आला असून हादरे तसेच ध्वनीअवरोध प्रणालीही बसविण्यात आली आहे.

(04 Oct 2012 – Lokmat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here