MarathiBoli Competition 2016 – का , यालाच म्हणतात मैत्री?

0
1480

MarathiBoli Competition 2016 -Marathi Kavita- का , यालाच म्हणतात मैत्री?

marathi-kavita

 

का , यालाच म्हणतात मैत्री?
का , यालाच म्हणतात मैत्री?
कुणी, कुणाशी,कुठे,कधीही?
करते ती एक मैत्री,

ओळ्ख नाही, पाळख नाही,
तरीही होते ती मैत्री ,
का अशीच होते मैत्री?

अंधारातून प्रकाशाकडे,
निराशेकडून आशेकडे,
मार्ग दाखवते ती मैत्री,
का यालाच म्हणतात मैत्री,
का अशीच होते मैत्री?,

सात वचनांची माळा गुंफी,
विश्वासाच्या दोरीत गुंफी,
त्या माळेतील मोती अनमोल,
का अशीच असे मैत्री,

परंतु…

कधीही धरावे, कधीही सोडावे,
हास्य करावे, गम्य धरावे,
लोभ करावा, राग धरावा,
अविश्वासाचा घाव घालूनी तुटते हीं मैत्री,
का यालाच म्ह्णतात मैत्री?

सहजपणे बोलतात तें ओठ,
विसरुनी जा ती आपली नाती,
विसरुनी जा ती आपली मैत्री,
का अशीच तुटते मैत्री,
का यालाच म्हणतात मैत्री?
का यालाच म्हणतात मैत्री?
—हरेश विजय झरकर .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here