Marathi Movie Kokanastha – कोकणस्थ.. ताठ कणा हाच बाणा

0
2469

Marathi Movie Kokanastha – कोकणस्थ.. ताठ कणा हाच बाणा

Marathi Movi kokanastha

कोकणस्थ म्हणजे अर्थातच कोकणात राहणारा … याच कोकणस्थ सामान्य माणसाची कथा म्हणजेच महेश मांजरेकर दिग्दर्शित “कोकणस्थ“.

ग्रेट मराठा एंटरटेंमेंट आणि स्टार प्रवाह प्रस्तुत कोकणस्थ ही कथा आहे, रामचंद्र गोविंद गोखले या सामान्य मध्यम वर्गीय निवृत्त माणसाची. ज्याचे सरळ आणि शांत आयुष्य एका घटणेमुळे संपूर्ण बदलून जाते .  आणि सुरू होतो न्यायासाठीचा लढा. एका सामान्य कोकणस्थ माणसाचा लढा.

रामचंद्र गोविंद गोखले यांची भूमिका सचिन खेडेकर यांनी साकारली आहे तर त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलकर्णी या चित्रपटामधून प्रथमच महेश मांजरेकरान बरोबर काम करत आहेत. तर उपेंद्र लिमये आणि नवोदित वैदेही परशुरामी, रोहण तळवलकर हे सहकलाकारांच्या भूमिकेत आहेत.

मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

चित्रपटाचा ट्रेलर सुंदर आहे, त्यातील संवाद उत्तमच , त्यातीलच मला आवडलेला संवाद.

आमची शांतता आमच्या बुद्धिमत्तेतून आली आहे त्याला भित्रेपणा समजू नका.

अशी कोणती घटना एका साध्या सरळ माध्यम वर्गीय कोकणस्थ माणसाला न्यायासाठी शस्त्र उचलण्यास भाग पाडते ते पहाण्यासाठी, चित्रपट नक्की पहा १० मे २०१३ ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये.

[tube]3K1BhV9t_7A[/tube]

निर्मिती    : ग्रेट मराठा एंटरटेंमेंट , स्टार प्रवाह.
दिग्दर्शक  : महेश मांजरेकर
कथा         : महेश मांजरेकर
कलाकार   : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये , जितेंद्र जोशी,मेधा मांजरेकर, वैभव मांगले ,सविता मालपेकर ,रोहण तळवलकर, वैदेही परशुरामी, मानसी नाईक
संगीत      : अक्षय हरीहरन
गाणी        : संदीप खरे
प्रदर्शनाची तारीख : १० मे २०१३

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here