Zapatalela 2 Marathi Movie – झपाटलेला २
तब्बल २० वर्षां नंतर दिग्दर्शक महेश कोठारे पुन्हा रसिकां समोर सादर करीत आहेत “झपाटलेला २” तोही थ्रिडी (3D) मध्ये .
महेश कोठारे हे नेहमीच, काहीतरी धडाकेबाज प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये सादर करतात , असाच एक प्रयोग त्यांनी १९९३ साली केला झपाटलेला चित्रपटामध्ये. हा भयपट मराठी रसिकांना खूपच आवडला. आज वीस वर्षां नंतर पण रसिक झपाटलेला चित्रपट विसळले नाहीत. वीस वर्षां पूर्वीचा तात्या विंचू आजही रसिकांच्या मनामधे आहे , त्या तात्या विंचुचा मृत्युंजय मंत्र “ओम फट स्वाहा ” आजही लक्षात आहे.
याच चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर सादर करीत आहेत झपाटलेला २ (3D) मध्ये ७ जून ला.
मराठी चित्रपट सृष्टीतील झपाटलेला २ हा पहिलाच सिक्वेल चित्रपट ठरणार आहे, याच चित्रपटातून VIACOM 18 मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. झपाटलेला 2 हा मराठीतील पहिला 3डी चित्रपट आहे.
झपाटलेला 2 मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, मकरंद देशपांडे.
झपाटलेला 2 चा पहिलाच प्रमो मराठीबोली च्या वाचकांसाठी.
[tube]NTUfHt7y7Fo[/tube]
its very good for kids,my baby enjoyed it very much,dont ask about me