मृत्यू – Marathi Kavita

0
168
Marathi Kavita Mrutyu

Marathi Kavita – Mrutyu – मृत्यू

कवयित्री – नुतन नागरगोजे

सहवास हवाय
मलाही आज तुझा ,
कधी होशील साथीदार
त्याचं एका क्षणासाठी तु माझा..

देतोस आलिंगण
जेंव्हा केंव्हा तू कोणाला ,
करतोस बंधनमुक्त म्हणे
प्राक्तनातून सुखःदुखःला…

भेटतोस एकदाच
तरिही होतोस इतका जवळचा,
देऊन जातोस अनेकांना
नजराण्यात काळोख आक्रोशाचा …..

बघता बघता संपवतोस
जणू सगळ काही,
जळतात शब्द, विरतात भावना,
उरतो एकचं प्रश्न काय आहे आणि काय नाही?…..

भेटशील का मलाही
त्याच एका क्षणासाठी ,
विचारायचेत प्रश्न
सोडायच्यात कित्येक गुढ़ गाठी…

नुतन नागरगोजे ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here