
Marathi Kavita – Ti Ek Sandhyakal – ती एक सुंदर संध्याकाळ
कवयित्री – सौ. मानसी अक्षय मुळे
संगमनेर.
शांत किनारा , अंगावर शहारा
पक्ष्यांचा किलबिलाट भोवती
रम्य मनोहर दिसे नजारा
ती एक सुंदर संध्याकाळ होती..
हातात नाही हात
पण भास सभोवती
गोड त्या संवांदांचे गीत गात
ती एक सुंदर संध्याकाळ होती..
मंदिरातील घंटानाद
प्रसन्न वातावरण सोबती
त्यात तुझी कमी भासे
ती एक सुंदर संध्याकाळ होती..
तुझ्या मिठीतील तो गोडवा
आठवण तुझी क्षणाक्षणाला येती
किती गावी त्याची महती
ती एक सुंदर संध्याकाळ होती..
सौ. मानसी अक्षय मुळे
संगमनेर.