Marathi Kavita – इतकं सोप्प नसतं गं ………!

0
1741

Marathi Kavita – इतकं सोप्प नसतं गं ………!

Marathi Kavita इतकं सोप्प नसतं गं ………! जमिनीच्या एका तुकड्यातून दुस-यात रुजनं …! मुळासकट स्वत:ला उपटून … मातीत मिसळणं ……!!! इतकं सोप्प नसतं गं ………! एकाच मनात मनाची शकलं करून जगणं ….! आणि प्रत्येक जगण्यात स्वत:चा शोध … घेत राहणं …….!!! इतकं सोप्प नसतं गं ………! अवति भवतीच्या गोंगाटात आतला आवाज ऐकणं ……! उठल्यापासून मिटेपर्यंतचा प्रवास असा एकट्यानं करणं …… !!! इतकं सोप्प नसतं गं …….! प्रत्येक भोगाला नियतीचं फळ समजून ओटित घेणं …… ! आणि अहेवलेणी मोक्षासाठी सतीचं वाण पेलणं ……!!!                                                              ” समिधा “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here