मायचं घर – Marathi Kavita Mayach Ghar
माझ्या मायचं घर
लई लई मायेचं
तिच्या दुधातील
साखर गोडीचं..
माझ्या मायचं घर
बापूच्या घामाचं
मोठया मोठ्या डोळयात
ऊली ऊली सपनाचं
माझ्या मायचं घर
कृष्णाचं गोकूळ
दुःखाला तुटवडा
मायेचंच तिथं खूळ
माझ्या मायची माया
जगापरीस येगळी
तिच्याबिगर माझी
खाली राहिल झोळी…..
कवयित्री – राणी शिंदे
संपर्क – ranipshinde@gmail.com