MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
आई म्हणे मला साडी,
बाबा म्हणे मला काशी,
ताई म्हणे मला का, काहीच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
माता पिता सेवा करू की,
संसाराला मेवा चारू.
बहिनीच्या गळ्यात,मोत्याची का माळ घालू,
बाहुलीच्या लग्नाला पैसा कुठून जमवू.
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
सेवा करीत करीत वय आता सरिले,
बहिनीचे माहेरपण ,अजुन काही उरीले.
संसाराची ओढाताण,आता काही संपिली,
बायाकोची हौस-मौज,करायची राहिली
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
माझ्या या नराला ,ना माहेरची माया,
माझ्या या नराला,ना सासराची छाया,
माझ्या या नराला ,नाही आला कुठुंनी सांगावा,
बायको म्हणे आता ,कुठे गेली ती माया,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
बाहुलीचे लग्न झाले,मुलाला काहीच न उरले,
माइया या मुलाला विसावा आता कुठेच नाही,
थकलेल्या नराला विसावा असा कुठेच नाही
प्रिया कुलकर्णी /बीडी