आज जरा वेगळाच विषय आहे…
पण .. जे मनाला वाटाले ते लिहीत आहे….
कालच एका दुकानाच्या बाहेर पाती वाचली … “आमच्या इथे बालकामगार काम करत नाहीत”…
चांगले वाटले…
पण जेव्हा घरी येऊन टीव्ही बघायला लागलो …तर एक लहान मुलांचा डान्स चा कार्यक्रम चालू होता… मुलेही खूप छान नाचत होती…
पण …मनात आले…या लहान मुलांचे काय… ही पण एक प्रकारचे कामच करत आहेत…ते पण संपूर्ण जगाच्या समोर…आणि …आपली शाळा बुडवून…
फरक एकच..ही मुले कामावतात त्यांना जे पैसे मिळतात ते..एखाद्या हॉटेल मध्ये काम करणार्या मुलाच्या तुलनेत खूपच जास्त असतात…
मग फक्त या पैशांसाठीच यांना यांचे पालक जबरदस्तीने… इथे पाठवत नसतील …???
सरकारने नियम तर केला…की अल्पवयीन मुलाला..कोणीही नोकरीवर..ठेवले तर तो कायद्याने गुन्हा आहे… पण याची कोणतीही व्यवस्था केली नाही की अशा अल्पवयीन मुलाने मग जगायचे तरी कसे…
आपल्या मुंबईतच कितीतरी लहान मुले सिग्नलवर भीक मागताना दिसतात…पण यांच्या कडे दूसरा पर्याय तरी काय आहे…
एका बाजून आपला समाज…रिअलिटी शो मधील मुलांचे कौतुक करतो…तर अशा..रस्त्यावर भीक मागणार्या मुलांची किळस करतो…
पण हा विचार करत नाही…की अशा एकट्या लहान मुलांनी जगायचे तरी कसे…
जर हॉटेल मधील डिश उचलणे, टेबल साफ करणे ही कष्टाची कामे असतील…तर दिवसा प्रॅक्टीस करून रात्री शो चे शूटिंग करणे …हे कष्टाचे काम नाही???
जर या लहान मुलांचे हॉटेल मधील काम म्हणजे बालमजुरी ठरत असेल…तर रिअलिटी शो मधील मुलांचे काय…?
या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय वाटते ते मला सांगा…
कदाचित आपण एकत्र याचे उत्तर शोधू शकू…