नकोसे स्पर्श – Marathi Kavita Nakose Sparsh

0
755

Marathi-Kavita-Nakose-Sparsh

नकोसे स्पर्श – Marathi Kavita Nakose Sparsh

कवी  : तेजस अतितकर
संपर्क : atitkar.tejas@hotmail.com

नकोसे स्पर्श नी नकोश्या नजरा,
किळसवाण्या समाजाचा हा पुरुषी सदरा।
तुलाही का असतात इच्छा आकांक्षा,
इथे चढउतारांवरच असते मालकी अपेक्षा।।

वय वर्ण जातपात,त्यावेळी काहीच नाही,
हवी फक्त ती, मुकाटयाने सोसणारी वेश्याही।
ना धाक शिक्षेचा, ना कुणाच्या शब्दांचा,
नव्या वेळी नवा खेळ, फक्त ओरबडण्याचा।।

ना तु व्यक्त व्हायचस मोकळेपणानी,
ना त्याच्यासारख जगायचस, मुक्त मनानी।
मानसिकता जुनीच माञ कातडी नवी बघण्याची,
बाईपणाची एक झालर असते ना पिढ्यापिढ्यांची।।

गर्दी असो वा एकांत, तुलाच सांभाळाव लागतं,
खेळण्यातल्या बाहुलीला तिचं मन कुठं आसतं।
गरज कि विकृती,शेवटी चर्चा ती होतच राहते,
निर्भयाच्या बातमीत आसिफा, एवढेच काय ते बदलत जाते।।

#तेजोमय©_८६००००७९९७

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here