Marathi Article – मानाचा मुजरा….

2
1710

Marathi Article – मानाचा मुजरा….

Marathi Article

सुर्य पश्चिमेला झुकलं आणि आकाशात तांबडा रंग पसरला. देवळाकडे स्पीकर सुरे झाले आणि वार्याची मंद झुळूक असताना आरतीचा गजर घुमू लागला. बघता बघता अंधार झाला आणि खेळ रंगला तो  दशावताराचा.

देवळा समोरच एक मंडप घालण्यात आले आणि सुरु झाली एक अध्बुत संध्याकाळ. दक्षिण कोंकणात प्राचीन काळा पासून आलेली लोक कला म्हणजे दशावतार. स्थानिक भाषेत त्याला दहीकाला असं म्हटला जातं. तुळशीचा लग्न  लागलं कि दुसऱ्या दिवशी पासून दशावतारी  कलाकार  आपला घर सोडून कलेच्या सेवेत निघतात .एक एक गाव करत रोज प्र्यतेक गावात जाऊन हि लोककला सादर करणे इतकाच उदेश्य. मानधन म्हणून गावातली मंडळी या कलाकारांना मदत करतात.

पूर्वीच्या काळात गावोगावी जाऊन मनोरंजन करणे हा या मंडळींचा हेतू. त्या काळी दूरदर्शन, भ्रम्हणध्वनी इतर सोयी नाही होते. त्या काळी दशावतारी नाटकं जन जागृती, समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचे  कार्य करीत. या नाटकांना अध्यात्माची जोड असते. गण – गवळण., राजा ,राक्षस, दानव, देवी देवत…अशे अनेक व्यक्तिरेखा आपल्याला या नाटकातून दिसते. नाटकाला संगीताची जोड असते. ढोल आणि घंटा या दोन वाद्यंने संपूर्ण मंदिर परिसर भाव पूर्ण होतो.

रात्र सुरु झाली कि गणपती च्या प्रवेशाने या नाटकाला सुरवात होते आणि हळू हळू रात्र सरकत असताना नाटक विषयाला घेऊन सरकतं. नाटकच विशेष आकर्षण म्हणजे पुरुषाने सादर केलेली स्त्री व्यक्ती रेखा. अगदी बाई ला सुद्धा लाजवेल अशी अदा, नखरे, लाजणं ,मुरडणं, हाव भाव. अगदी सगळच. अनेक वर्ष चालत आलेली हि परंपरा आज हि तशीच सिंधूदुर्ग जिल्ह्यात पाहिला मिळते. अगदी कठीण परिस्तिथित जगत असून सुद्धा कले साठी झटत असणाऱ्या  या मालवणी कलाकारांना मानाचा मुजरा.

2 COMMENTS

  1. Swap, very nice and true picture of “Dahikala” keep it up..write something mentioning Malvan and surrounded village like Kandalgaon, Revandi etc.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here