MarathiBoli Competition 2016 – कविता माझी आणि तुझी
दुख:तून जागे होऊ पुन्हा नवी पहाट घेऊन
क्षणभंगुर या सुखामध्ये नवी कहाणी आपली घेऊन
वाटत होते सोबत देतील जे होते सुखाचे सोबती
कळलच नाही दुख नेहमी अनाथ असत या मोठ्या जगती
क्षणाचा हि विलंब न करता पुन्हा नव्यान जगूया
भूतकाळाला विसरून आता भविष्याच्या कंबरेत हात घालून नाचूया
लोकांच्या जुजबी पानाची मला आता कीव येतीये
पुढारलेल्या या जगाची हल्ली खूप भीती वाटतीये
प्रत्येकाला आपण जातीमध्येच का तोलावं
नैतिकतेच्या गोष्टी करणार्यांनी आताच का न बोलावं
संपून टाकू हे दारिद्र्य आता भेकड विचारांचे
नव्या उमेदीने करू सुरुवात नव्या जमान्याचे
Auto Amazon Links: No products found.