Marathi Movie Aamhi Bolato Marathi – आम्ही बोलतो मराठी
निर्माता – आनंद म्हसवेकर , राजा नदार, समीर & स्वप्नील मोहित , कादंबरी आर्य प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक – आनंद म्हसवेकर
कथा , पटकथा – आनंद म्हसवेकर
संगीत – मधुकर आरकाडे, सतीश चंद्रा, विजय गटलेवार, श्रीकांत राजेंद्र
गायक- आदर्श शिंदे, माधुरी करमरकर , राहुल सक्सेना, संजय सावंत, वैशाली सामंत, वैशाली माडे.
कलाकार – विक्रम गोखले, अरुण नलावडे, सविता प्रभूणे, भक्ति देसाई. शैलेश दातार, सक्षम कुलकर्णी.
प्रदर्शन – १२ सप्टेंबर २०१४
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, अर्जुन, स्वराज्य यानंतर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा विषय घेऊन आनंद म्हसवेकर सादर करीत आहेत आम्ही बोलतो मराठी.
एका स्वाभिमानी मराठी माणसाची कथा, ज्याला परप्रांतीयांविरुद्ध विशेष राग आहे, तो त्याच्या रोजच्या वागण्यातून दिसतो.
तो ज्या सोसायटीमध्ये राहतो ती मराठी माणसांची सोसायटी आहे, आणि त्यात कोणत्याही परप्रांतीयाने येऊ नये असे याला वाटते. त्यातून सुरू होतो संघर्ष देशपांडे(विक्रम गोखले) विरुद्ध पांडे(अरुण नलावडे).
दोघेही कसलेले अभिनेत्रे असल्याने चित्रपट नक्कीच रंगतदार असेल यात शंका नाही.
आम्ही बोलतो मराठी पहायला विसरू नका, जवळच्या चित्रपटगृहात १२ सप्टेंबर २०१४ पासून.
मराठी पुस्तके वाचायची आहेत ?
तुमच्या शहरात मिळत नाहीत ?
मग भेट द्या की मराठीबोली.कॉम
सर्व पुस्तकांवर १०% सवलत .
ना नफा ना तोटा संकल्पनेवर आधारित एकमेव संकेतस्थळ.