Diwali Ayurvedik Tips : दिपावली : अभ्यंग स्नानाचे महत्व

0
2679

दिपावली : अभ्यंग स्नानाचे महत्व

डॉ. पोर्णिमा काळे.

 

Diwali Ayurveda

 

दिवाळी आली कि आपल्या सगळ्यांना फराळाचे वेगवेगळे पदार्थ, सकाळी आई च्या हाताने उटणे व तेल लाऊन गरम पाण्याने आंघोळ, सगळीकडे दिव्यांचा प्रकाश, फटाके फोडण्याचा आनंद इ. सगळ्या गोष्टी आठऊ लागतात.

सुवासिक उटणे व तेल लाऊन आंघोळ का करावी? याला उद्वर्तन व अभ्यंग स्नान असे म्हणतात.

उद्वर्तन: उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलापनम् ।

        स्थिरीकरणम् अंगानाम् त्वकप्रसादकरं परम् ॥

अंगास उटणे लावण्याने शरिरात वाढलेला अतिरिक्त मेद व कफ कमी होतो. शरिर दृढ बनते. त्वचा स्वच्छ होवून तीचा वर्ण उजळतो.

अभ्यंग : “ अभ्यंगम् आचरयेत् नित्यं स जरा श्रम वातहा ।

                  दृष्टी प्रसाद पुष्टी आयु स्वप्नसु त्वक्त्वदाढर्यकृत् ॥“

अभ्यंग म्हणजे सकाळी अंघोळीच्या आधी कोमट तिळाच्या तेलाने संपूर्ण अंगास मालीश करणे होय. अभ्यंग हा रोज करण्यास सांगितला आहे. आजकाल मार्केट मधे विविध अभ्यंग तेल मिळतात, ते वापरले तरी चालते. रोज अभ्यंग स्नान केल्याने लवकर म्हातारपण येत नाही (म्हणजे त्वचेवर सुरूकुत्या पडणे इ लक्षणे दिसत नाहित), थकवा जातो, वातदोष शरिरात वाढत नाही. दृष्टी प्रसादन करतो (म्हणजे नजर स्वच्छ रहाते, लवकर चष्मा लागत नाही, डोळ्यांना कमजोरी येत नाही), शरिराची पुष्टी होते (सप्त धातूंचे बल वाढू लागते), आयुष्य वाढते, झोप छान लागते (निद्रानाशाचा त्रास कमी होतो), त्वचा चांगली बनून शरिर दृढ बनते.

मुख्यतः अभ्यंग डोके, पाय व कानांच्या ठिकाणी नेहमी करावे.

ज्यांना कफविकार (सर्दी इ.) झाले आहेत, सध्या पंचकर्म सुरू आहे किंवा करून घेतले आहे, अजिर्ण झालेले आहे अशांनी अभ्यंग करू नये.

डॉ. पोर्णिमा काळे.

(आयुर्वेदाचार्य) शिवसमर्थ आयुर्वेद क्लिनिक, पुणे.

Kale360@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here