Marathi Kavita: Aathavanincha Saatha – आठवणींचा साठा

9
3172

Marathi Kavita: Aathavanincha Saatha – आठवणींचा साठा………

ही कविता मी जे काही बघतो त्यावरती आधारित आहे. यात मी एका अनोळखी व्यक्तीने माझ्या सोबत व्यक्त केलेले त्याच्या जीवना बद्दल मांडले आहे. मी ही कविता हिंदीत लिहण्यासाठी चालू केलि. पण मग मला माझ्या हझर्णीस मॅडम चे शब्द आठवले,”एखादी गोष्ट मातृभाषेतच मांडली तर त्याचा मर्म छान रित्या व्यक़्त करता येतो.” मघ काय लिहली मराठीत. आशा आहे के सर्वांना आवडेल.

marathi Kavita Athavanincha Satha on MarathiBoli

आठवणींचा साठा……….
– सागर दिवटे

आठवणींच्या वनात ओढत गेलो
स्वताला त्यात विसरून आलो…….

ती सोनेरी पहात, त्यात चिमण्यांचा घन घनात
तोः सकाळचा श्वास, त्याचा मंध घाम घामात
विसरलेले सारे सामोरी आले
डोळ्यात आनंदाचे पांझर फुटले

आठवणींच्या वनात ………….

ती गोड माया, त्यात मोठी दया
तोः आनंदाचा लाल, जो सगळ्यांना हवा
वाटलेले तैसे नाही झाले
मनात कोठे डांबून बसले

आठवणींच्या वनात ………….

ती सुंदर सांझ, त्यात पतंगांची लाठ
तो भर भारता वारा, त्याचा अंदाज आवारा
वाहून गेलेले सारे काही आता सापडले
त्यातच मला आपले सुख लाभले

आठवणींच्या वनात ……………….

ती आयीची सावली, त्यात मिले समृद्धी
तो बाबांचा बोठ, त्याचा शिक्षेचा घोठ
त्याचे यश मला आता मिळाले
ते उपभोगायला कोनही नाही उरले

आठवणींच्या वनात ऒधत गेलो
स्वताला त्यात विसरून गेलो…………. विसरून गेलो …………

– सागर दिवटे

शेवट वाचून कसच तरी वाटला असेल, मला ही वाटला जेव्हा मी त्या व्यक्ती ची गोष्ट अय्कत होतो. मला एक शिकायला भेटले की आयुष्यात खूप सार्या वाईट गोष्टी घडतात, तेव्हा आपण दुखत न खचत आनंदाच्या आठवणी तयार केल्या हव्या. आणि जर काही आठवणी आल्याच तर अशीच एखादी कविता वाचून मनाला समजूत द्यायची.

9 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here