Marathi Kavita – सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते
तुज़ पाहता
दिल रंगते दंगते
भान हरपते
श्वासाला येते भरती
वादळ वारे सुटते रे
वार्याने तुफान उठते रे
सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते
तुज़ मनातील घालमेल सर्व जाणते
हरेक भेट सह्वासाची ओढ वाढवते
न सांगता आज हे कळे मला
कसा जीव तुझा माझ्यामधे गुंतला
सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते
दिमाग मधेच नाक खुपसते
लग्नाचे निकष तुजवरी आजमावते
प्रेमभंगाचे दु:ख जिव्हारी
न येवो भाळी तुझिया
असे वाटते
दिल सावरते मागे फिरते
सखी तुज़ दिल माझे, प्रिये म्हणते