Swatantryavir Vinayak Damodar Swarkar – स्वातंत्र्यवीर

0
1862

Vinayak Damodar Swarkar – स्वातंत्र्यवीर

swatantryavir-sawarkar

स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्य सूर्य

असे म्हणत असताना

आम्ही या स्वातंत्र्याची किंमत केली नाही

तुमचा पराभव करायला
जुलमी ब्रिटिश राजवट हि
अक्षरश: कमी पडली
अत्यंत प्रखर , प्रगल्भ आणि
पराकोटीचा देशभक्त म्हणून
त्यांनी तुमचं अस्तित्व मान्य केले

पण आम्ही आप्त स्वकीयांनीच

तुमचा सगळ्यात मोठा पराभव केला

तुम्हाला काय म्हणायचं आहे

याचा कणभर हि अभ्यास न करता

तुमच्या वर कसले ना कसले शिक्के

मारून आम्ही तुमचा आणि पर्यायाने देशाचा

सगळ्यात मोठा पराभव केला आहे

आम्ही तुम्हाला साहित्यिक म्हणून

अनुभवले नाही, तुमचं साहित्य समजून

घेण्याची कुवत आजही आमचं शिक्षण

आम्हाला देऊ शकत नाही

विज्ञानाची कास धरणे तर सोडूनच द्या

आम्ही आजही त्याच कर्म कांडाच्या

चौकटीत इतके पक्के अडकलो आहोत

कि आम्ही आता त्यांनाच संस्कृती म्हणतो

काळ्या पाण्याची शिक्षा तर

फारच दूरची झाली हो

साधे सिग्नल पाळणे हि सुद्धा आम्हाला

शिक्षा वाटते

कर भरले कि आपण देशसेवा करतो

या भ्रमात आम्ही जगतो

मग ने मजसी ने मधली

मातृ भूमीची ओढ कशी कळेल आम्हाला

आयुष्यभर देशप्रेम हाच संसार मानणाऱ्या

कोणताच जातीभेद न मानता सामाजिक कार्य करणाऱ्या

बुद्धिनिष्ठ आणि परखड पणे सर्वच धर्मातील अंधश्रद्धा वर फटकारे मारणाऱ्या

परकीय राजवटीला ज्यांची सतत धास्ती वाटत होती

अश्या एका एकमेव अद्वितीय नेत्याला

आम्ही “हिंदुत्ववादी” असा ठप्पा मारून

अडगळीत टाकून दिले

इतकी अवहेलना तर परकियांनी हि नाही केली

वर्षातून एखादा दिवस जरी

तुमच्या स्मृतीं वरची धूळ झटकली

मनाची कवाडे खुली करून

तुमचा एक जरी विचार समजून घेऊन

कृतीमध्ये आणला तरी

सार्थक होईल जीवनाचे आमच्या

अखंड विज्ञान आणि देशप्रेम यांची

ज्योत तेवत ठेवण्याऱ्या

स्वातंत्र्य सूर्याला

आमच्या सारख्या काजव्यांचे

शतश: नमन

-शीतल जोशी

#swatantraveer #ViDaSawarakar #marathikavita #marathiblogs #सावरकर #स्वातंत्र्यवीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here