Time Please Marathi Movie – मराठी चित्रपट टाइम प्लीज

0
3214

Time Please Marathi Movie – मराठी चित्रपट टाइम प्लीज

टाइम प्लीज … लव स्टोरी लग्नानंतरची…

Time Please

समीर विद्ध्वंस दिग्दर्शित आणि प्रतिसाद प्रॉडक्शन २४ क्यारट एंटरटेंमेंट निर्मित टाइम प्लीज .. लव स्टोरी लग्नानंतरची.(Time Please .. Love Story Lagna Nantarchi ) हा मराठी चित्रपट २६ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जुन्या गाजलेल्या कादंबर्‍यांवर किंवा नाटकांवर चित्रपट बनवण्याचे सत्र सुरू झाले आहे. पुढील शुक्रवारी म्हणजेच १९ जुलै रोजी प्रदर्शित होणारा दुनियादारी हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित आहे.  तर अक्षय कुमार निर्मित ७२ मैल एक प्रवास हा चित्रपट देखील ७२ मैल या कादंबरीवर आधारित आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदशीत झालेला संशयकल्लोळ हा चित्रपट संशयकल्लोळ या नाटकावर आधारित होता. तर गाजलेला बीपी चित्रपट बालक पालक या एकांकिकेवर आधारित होता. ही यादी खूप मोठी आहे यात अनेक गाजलेल्या चित्रपटांची नावे येतील.

आता पुन्हा एकदा समीर विद्धवंस नवा गाडी नव राज्य या नाटकावर आधारित टाइम प्लीज हा चित्रपट घेऊन येत आहेत. चित्रपटचा लुक एकदम फ्रेश आहे, तर मुख्य कलाकार आहेत प्रिय बापट, उमेश कामत, सिद्धार्थ जाधव आणि सई ताम्हणकर.

Time Please Marathi Movie

अमृता(प्रिय बापट) या २४ वर्षीय मुलीचे ऋषि(उमेश कामत) या ३० वर्षीय युवकशी लग्न होते , आणि सुरू होते लव स्टोरी लग्नानंतरची.  एकमेकांचा स्वभाव समजून घेत दोघांचा संसार सुरू होतो.

खरी गम्मत तेव्हा सुरू होते जेव्हा ऋषि च्या ऑफिस मधील सहकारी राधिका (सई ताम्हणकर ) आणि अमृताचा बालमित्र हिम्मतराव (सिद्धार्थ जाधव) यांचा चित्रपटात प्रवेश होतो.. आणि सुरू होतो नात्यांचा भावभावनांचा खेळ.

Time Please Marathi Movie

या खेळाची मजा अनुभवण्यासाठी नक्की पहा टाइम प्लीज लवस्टोरी लग्नानंतरची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here