Marathi Music Album Hello – वैशाली मानसी संगे सागरिकाचा ‘हॅलो’
मराठी संगीत विश्वात गेल्या अनेक दशकांनपासून “सागरिका म्युझिक” ने अनेक उत्तमोत्तम गाणी देत आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अतिशय कल्पकतेने मराठी अल्बमद्वारे मराठी रसिकांना वेगवेगळे संगीतप्रकार ऐकविण्याची सागरिका म्युझिकची जणू खासियतच आहे.
मराठी संगीतप्रांतात आणखी एक नावीन्यपूर्ण प्रयोग ‘हॅलो’ या अल्बमच्या माध्यमातून सागरिका म्युझिकने आपल्यासाठी आणला आहे. एकाच गाण्यावर दोन वेगवेगळे व्हीडीओज असलेल्या ‘हॅलो’ या गाण्याने युट्यूबवर सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. मराठी संगीत विश्वात प्रथमच असा हा नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे.
‘हिट्स’ च्या अनभिषिक्त सम्राज्ञी ‘वैशाली सामंत’ यांनी हे गाणं गायिले असून सुप्रसिद्ध नृत्यांगना ‘मानसी नाईक’ वर या गाण्याचे चित्रिकरण करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत गायिलेल्या मराठी गाण्यांपेक्षा हे गाणं खूपच वेगळं आहे. क्लब सॉँग या प्रकारात मोडणार्या या गाण्याचे बोल हे आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून असल्याने त्याला चाल देताना, तो बाज कायम ठेवण्याचं आव्हान होतं असं मत या गाण्याच्या संगीतकार, गायिका वैशाली सामंत यांनी सांगितले .
एकाच गाण्यावर २ वेगवेगळ्या अदा दाखवणारी मानसी नाईक हिच्या मते, प्रथमच सागरिका बाम यांच्यासोबत मी काम करत असल्याने या अनोख्या प्रयोगाचा मी एक भाग आहे याचा मला अतिशय आनंद आहे. खंरतर एकाच गाण्यासाठी २ वेगवेगळ्या लूक्समध्ये स्वत:ला पाहाण्यासाठी मी अतिशय उत्सुक होते .एकीकडे खूप साधी तर दुसरीकडे एकदम ‘बोल्ड’ अवतारात दिसणं हेच खूप आव्हानात्मक होतं मात्र आमच्या सर्व टिमने यावर खूप मेहनत घेतली आहे असं मानसी आवर्जून सांगते.
[tube]QbOcOkzBoyk[/tube]
या नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या व्हिडीओच्या दिग्दर्शक सागरिका बाम या स्वतः या गाण्याचा व्हिडीओ बनवताना गोंधळल्या होत्या. पण नंतर लक्षात आलं की या गाण्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. जे प्रत्येक व्यक्ती ऐकताना त्याला जाणवेल. मग या एकाच गाण्यासाठी दोन वेगवेगळ्या अदांचे व्हिडीओ बनवण्याची कल्पना आली, आणि ती मी वैशाली व मानसीला बोलवून सांगितली. त्यानाही कल्पना आवडली आणि त्यातून ‘हॅलो’ ची वाटचाल सुरु झाली. एकंदरीतच गाण आणि व्हिडीओज ना मिळणारा प्रतिसाद पाहता ‘हॅलो’ नावाच्या एका नव्या शो च्या निर्मितीवर सुद्धा काम सध्या सुरु आहे .
[tube]PIQYe3bF1-k[/tube]
या गाण्याच्या निमित्ताने ‘सागरिका म्युझिक”ने प्रेक्षकांना कोणता व्हिडीओ आवडला आणि का? यावर लवकरच एक स्पर्धा होणार असल्याचे जाहीर केले असून विजेत्याला वैशाली सामंत आणि मानसी सोबत ‘डिनरची’ संधी मिळणार आहे.