Sangramrao Vikhe Patil : संग्रामराव विखे पाटील
तुमच्यासाठी कायपण…
हे वाक्य आपल्याला आता काही नवीन नाही…
कधी मित्राच्या फेसबुक वॉल वर, तर कधी ऑटो रिक्षाच्या मागे….अगदी बाईक्स च्या मागेसुद्धा आता हे वाक्य दिसू लागले आहे…
तुमच्यासाठी कायपण..हे वाक्य संग्राम नि एवढे प्रसिद्ध केले की…प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रियसीला एकदा तरी म्हटलेच असेल…”तुमच्यासाठी कायपण “…
स्टार प्रवाह या मराठी वाहिनी वरील देवयानी या मालिकेतील संग्रामराव विखे पाटील याचे हे वाक्य….
संग्रामराव विखे पाटील म्हणजेच संग्राम साळवी …. आपल्या कोल्हापूरच्याच असेलेला संग्रामने देवयानी या मालिकेतून मराठी रसिकांची मने जिंकली….
संग्रामला नसुरूद्धिन शहा सारखा कलाकार व्हयायचे आहे…असे तो स्वताच सांगतो..
संग्राम कोल्हापूरचाच असल्याने त्याला संग्राम विखे पाटील ही भूमिका करताना जास्त काही वेगळे करावे लागत नाही…त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा त्याचे हे खरे पण जास्त आवडते…
देवयानी ही मालिका स्त्रीप्रधान असून देखील संग्राम ने देखील स्वतची अशी एक वेगळी ओळख मात्र नक्कीच तयार केली आहे..
संग्रामचे देवयानी वरील प्रेम, त्याचा अॅग्री यंग लुक, अस्सल कोल्हापुरी भाषा आणि नेहमी खरेपणाला दिलेली साथ रसिकांना जास्त आवडते…
देवयानी म्हणजेच शिवानी सुर्वेने … तरुणांची जेवढी मने जिंकली तेवढीच तरुणींची मने संग्राम ने जिंकली…
पुन्हा एकदा संग्रामचेच वाक्य बोलावेसे वाटते..
मराठीसाठी कायपण….
मराठीबोली.