Marathi Movies in Rotterdam International Film Festival : मराठी चित्रपटांची रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्णी

0
1680

Marathi Movies in Rotterdam International Film Festival : मराठी चित्रपटांची रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्णी

fandry marathi movie anumita

सध्याचे मराठी चित्रपट हे मराठी चित्रपट सृष्टीला अधिकच उंचीवर घेऊन जात आहे…

बालक पालक अर्थातच बीपी या चित्रपटाला महार्ष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात यश मिळाले…हिन्दी चित्रपट रसिकांनी देखील बालक पालक हा चित्रपट पाहिला..

मागील वर्षात गाजलेल्या चित्रपट  “शाळा” याच्या अभूतपूर्व यशानंतर नीलेश नवलखा मराठी रसिकांसाठी घेऊन आले आहेत, एकदम नवीन कथा, नवीन लुक असलेला “फँड्री”  चित्रपट.

Nilesh-Navalakha
Nilesh-Navalakha

राष्ट्रीय परितोषिक विजेते निर्माते नीलेश नवलखा यांचा नवीन सिनेमा “फँड्री” प्रदर्शनाच्या आधीच अनेकइंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजत आहे. फँड्री च्या निर्मितीत त्यांना साथ लाभली आहे ती होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांची नवलखा आर्ट्स मिडिया एंटरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने फँड्री या सिनेमाची निर्मिती झाली असून सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ” पिस्तुल्या”साठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे याचं आहे.

Vivek KajariaVivek Kajaria

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) साठी फँड्रीची निवड झाली असून ३१ जानेवारी २०१३ रोजी दुपारी २.३० वाजता नेदरलॅण्ड येथे स्क्रीनिंग होणार असून ‘प्रोड्युसर्स लॅब’ या ग्लोबल पॅनल चर्चेसाठी फँड्रीचे निर्माते निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांची निवड झाली आहे. आपल्या सिनेमाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा या दोनही निर्मात्यांचा मानस आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेल्या ‘फँड्री’ सिनेमाची उत्सुकता आता अजूनच वाढली आहे हे नक्की.

‘फँड्री’च्याच जोडीला श्रीपंत प्रॉडक्शन्स आर्ट्स निर्मित आणि नवलखा आर्ट्स मिडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘अनुमती’ या आगामी सिनेमा देखील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) येथे ३१ जानेवारी २०१३ रोजी सकाळी ९.३० वाजता दाखविण्यात येणार आहे.

Anumati Marathi Movie
Anumati Marathi Movie

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनुमती या सिनेमाने याआधी कोल्हापूर आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलही गाजवलं आहे. अनुमती सिनेमाने कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोउत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला असून गजेंद्र अहिरे यांनी सर्वोउत्कृष्ट दिग्दर्शक तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला आहे. अनुमती या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या बरोबर रीमा, आनंद अभ्यंकर, नेहा पेंडसे, नीना कुलकर्णी, किशोर कदम आदी कलाकार मंडळी आहेत तर छायाचित्रणाची धुरा हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार गोविंद निहलानी यांनी सांभाळली आहे.

२३ जानेवारी पासून सुरु झालेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) हा फिल्म फेस्टिवल ३ फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे. फँड्री आणि अनुमती या दोनही सिनेमांना सादर करणारे निलेश नवलखा हे एक दोनही सिनेमातील महत्वाचा दुआ आहेत. जगातील अनेक उत्कृष्ट कलाकृतींचा यात समावेश असून फिल्म मेकिंग आणि त्यासंबंधी निगडीत विषयांवरील देवाणघेवाण करण्यासाठी हा उपक्रम भारतीय सिनेमांसाठी लाभदायी होईल अशी प्रतिक्रिया निलेश नवलखा यांनी नेदर्लंडवरन बोलताना व्यक्त केली आहे.आपल्या सिनेमाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा या निर्मात्यांचा मानस आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here