Marathi Actress Sanskruti Balgude Biography and photos – संस्कृती बालगुडे
संस्कृतीचा अभिनयाची सुरुवात झी मराठी वाहिनीवरील “पिंजरा” या मालिकेतून झाली. पिंजरा मालिकेतील आनंदी या मुख्य व्यक्तिरेखेला संस्कृतीने आपल्या उत्तम अभिनयाने योग्य न्याय दिला. या मालिकेमुळे ती आनंदी या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.
संस्कृतीचा जन्म १९ डिसेंबर १९९२ साली पुण्यात झाला, तिचे शिक्षण सिंबायोसिस सेकंडरी स्कूल आणि एसपी कॉलेज पुणे येथे झाले. २०१० साली मिस पुणे हा पुरस्कार संस्कृतीने जिंकला.
वयाच्या ७व्या वर्षापासून नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या संस्कृतीने स्वीत्झर्लंड, मॉरीशस आणि फ्रांस येथे नृत्याचे प्रयोग केले आहेत. पण आता महाराष्ट्रातील सर्व रसिकांना संस्कृतीला सतीश राजवाडे दिग्दर्शित सांगतो ऐका या चित्रपटातील एका FANTASTIC लावणी मध्ये पाहता येणार आहे.
संस्कृतीला मराठीबोली कडून हार्दिक शुभेच्छा.
- पिंजरा
- जल्लोष सुवर्णयुगाचा
- विवाह बंधन
- सांगतो ऐका