Prarthana Behere : प्रार्थना बेहेरे
जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा , या चित्रपटातून मराठी चित्रपटात अभिनेत्री म्हणून पदार्पण करणारी प्रार्थना बेहेरे,
प्रार्थना बेहेरे ही महाराष्ट्रियन मुलगी आहे, पण प्रार्थनाचा जन्म आणि शिक्षण गुजरात मध्ये झाले, सध्या प्रार्थना इटीव्ही मराठी वरील माय लेक या मालिकेमध्ये फौजदारी वकिलाची भूमिका करत आहे. ही मालिका आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे.
प्रार्थनाला प्रसिद्धी मिळाली ती तिच्या पवित्र रिशता या हिन्दी मालिके मधील वैशाली या भूमिके मुळे. प्रार्थनाने रिटा या मराठी चित्रपटात देखील काम केले आहे, तिने लव यू मिस्टर कलाकार आणि बॉडीगार्ड या हिन्दी चित्रपटा मध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
प्रार्थना चर्चेत आली ते तिच्या जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या अवधूत गुप्ते यांच्या मराठी चित्रपटा मुळे, या चित्रपटात प्रार्थनाने एका पंजाबी मुलीची भूमिका उत्तम प्रकारे केली आहे.
Prarthana Behare Wallpapers/Photos.
Sunder…